• Sat. May 3rd, 2025

तरुणी झोपेत असताना घरात शिरला; चाकूने वार, नंतर स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न, तरुणाच्या कृत्यानं गावात खळबळ

Byjantaadmin

Jan 17, 2024

अहमदनगर: एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निर्घृणपणे खून केला. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेतल्याची घटना १६ जानेवारीला घडली. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक लक्ष्मण काळे (२२) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर श्रावणी मोहन पाटोळे (१८) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. श्रावणीचे आजोळ असलेल्या राक्षसवाडी बुद्रुक येथे श्रावणी राहत होती. ती बारावीच्या वर्गात शिकत होती. प्रतीक काळे तिच्या घराच्या शेजारीच राहत होता. प्रतीकचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला तिच्या घरी आली. त्यानंतर ती घरी झोपली होती. तेवढ्यातच ती झोपलेली असताना प्रतीक अचानक तिच्या घरी आला. त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने श्रावणी झोपेत असताना तिच्या पोटामध्ये वार केला. हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली. यावेळी झटापट देखील झाली श्रावणी जोरजोरात ओरडली. शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणीला पाहिले.

killing girl through one sided love in Karjat

प्रतीक काळेनेही नंतर विष प्राशन करत त्याच चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले. दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या प्रतिकला नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *