• Tue. May 6th, 2025

सुषमा अंधारे कल्याणमधून लोकसभा लढणार? कार्यकर्त्यांची मागणी, शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन?

Byjantaadmin

Jan 15, 2024

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या बहुतांश महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत. शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

Loksabha Election 2024 Thackeray group office bearers demand Uddhav Thackeray to give ticket to Sushma Andhare from Kalyan Lok Sabha Constituency

 

सुषमा अंधारे कल्याणमधून लढणार?

या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव चर्चेत होते. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा देखील रंगली होती. ठाकरे गटाकडून आता शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांचं देखील नाव चर्चेत आले.कल्याण लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यात सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत, शिंदे यांचे वर्चस्व आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या तोडीचा उमेदवार असला पाहिजे, त्यासाठी अंधारेंना या ठिकाणी उमेदवारी द्यावी , अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सुषमा अंधारे- ठाकरेंची ढाल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *