महाराष्ट्र फार्मसीत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी निलंगा या महाविद्यालयात शिक्षक व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ प्राचार्य डॉ एम एन कोलपुके, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी. पी. गायकवाड, मुख्याद्यापक एम आर नटवे, प्राचार्य डॉ एस एस पाटील हे उपस्थित होते. महाविद्यालयात या माजी विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात महेश दमकोंडवार, टीम लिडर रिसर्च अॕंड डेव्हलपमेंट मायलान लॕब, हैद्राबाद , दयानंद पाटील डायरेक्टर ओलान्स फार्मा, माधव सोळुंके डेप्युटी मॕनेजर सिपला फार्मा, पुणे, ज्ञानेश्वर वाघ, सविता चांदोरे, मेडिकल रायटिंग अॕनालिस्ट. तेवा फार्मासुटिकल, दिपीका जाधव लिड डाटा मॕनेजर, श्रीचंद कांबळे, सिनियर असोसियट स्टेट बॕक अॉफ इंडिया , महाराष्ट्र फार्मसी अॕल्युमिनी असोसिएशनचे प्रा अविनाश मुळदकर यांच्या हस्ते व सर्व उपस्थित माजी विद्यार्थी व प्राध्यापकवृंद यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाली. महेश दमकोंडवार यांनी रिसर्च हे औषधनिर्माणशास्त्राचे एक महत्वाचे भाग आहे की ज्यामुळे वेगवेगळी औषधे आपण तयार केली. काळानूसार अतिशय भयंकर रोग जसे की कॅन्सर, डेंग्यु, स्वाईन फ्लु, व इतर अनेक जिवांचे बळी घेत आहेत. त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र संशोधन प्रयोगशाळेमध्ये औषधनिर्माता नवीन नवीन औषधे तयार करण्याचे काम अविरतपणे करतात. त्यांच्या या संशोधनामुळे या भयंकर रोगांना आळा घालणे शक्य झाले आहे. या मध्ये फार्मासिस्ट व नवीन औषध प्रयोग करण्यासाठी विविध वापरलेले जाणारे विविध प्राणी यांचे भरीव योगदान आहे. या संशोधनामध्ये औषधनिर्मात्यास भरपूर संधी आहे. की ज्यामुळे त्यांचे फक्त भविष्यच उज्वल न होता त्यांच्या हातून समाजकार्य होणार आहे. औषधनिर्माणशास्त्र हे एक अतिशय भविष्य उज्वल करणारे एक क्षेत्र आहे. अनेक रोग व वाढती लोकसंख्या यामुळे हे क्षेत्र झपाटयाने विकसित होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करीअरच्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. दिपीका जाधव यांनी औषधनिर्माणशास्त्र कंपनीमध्ये औषधे कशी तयार केली जातात. तसेच औषध निर्मितीमधील नवनवीन संशोधनाबद्दल सविस्तर माहीती दिली. रवी उडान यांनी आपल्या जीवनातील चढ उतार कसे आले यावरुन आपल्याला जीवनात कोणत्याही घेतलेल्या निर्णयावरा कसे ठाम रहावे लागेल याची विस्तृतपणे माहिती सांगितली. ज्ञानेश्वर वाघ यांनी आपल्याला व्यवसाय करताना कशा अडचणी आल्या व त्यावर मात करुन कसे बाहेर पडलो याचे मार्गदर्शन केले. यावेळी रतन पडींत, माधव सोळुंखे, मयुर इंडे यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले, . दयानंद पाटील यांनी महाविद्यालयाने अद्यावत प्रयोगशाळा, उपकरणे, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग व इतर सेवा सुविधा पुरविल्यामुळेच आम्ही या क्षेत्रामध्ये यश संपादन करु शकलो तसेच याचा शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल विस्तृतपणे सांगितला. तसेच सद्या शिकत असलेले व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद घडावा व त्यांचा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन कोलपुके, मुख्याद्यापक एम आर नटवे, प्राचार्य डॉ एस एस पाटील यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी विठ्ठल कलिटले, रामचंद्र घोडके, ज्ञानेश्वर झरकर, सपना झाकोटिया, शिरिष जिडगे, प्रमोद अंबारे, आरिफ पटेल, अनिल जाधव, प्राशांत कस्तुरे बालाजी गोविंदवार, संजय निम्मलवाड, शंतनु तौर, चंद्रविणा पाटील, शितल सातपुते, किर्ती मठपती, शिवकुमार जळगे, प्रविण गोदरे, रंगनाथ चव्हाण, नितीन गिरगिरवार, तुळशिराम कराळे, विघास गोरे, विलास गोरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्थावना डॉ संजय दुधमल व सुत्रसंचालन ऋतुजा काशिद यांनी तर आभारप्रदर्शन प्रा डॉ अमोल घोडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा डॉ चंद्रकांत ठाकरे, प्रा. विलास कारभारी यांचे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.