जिजाऊ सावित्री यांच्या विचारांची आजही गरज – प्रा. संभाजी नवघरे यांचे प्रतिपादन
निलंगा/प्रतिनिधी क्रांतिकारी समाज घडविण्यासाठी जिजाऊ सावित्री यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असून महामानवांच्या समतावादी विचारांनी वाटचाल केली तरचं संस्काररूपी समाज घडू शकतो असे प्रतिपादन प्रा. संभाजी नवघरे यांनी केले.मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिजाऊ सावित्री जन्मोत्सवा निमित्ताने एकदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन जिजाऊसृष्टी येथे करण्यात आले होते यावेळी व्याख्याते म्हणून प्रा. संभाजी नवघरे बोलत होते, प्राचार्य डॉ. भागवत पौळ अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव बालाजी जाधव,पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, किसन मोरे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव जाधव एम एम आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. संभाजी नवघरे म्हणाले,समाजात अनेक पराक्रमी महिला होऊन गेल्या त्यांचे विचारचं सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी कधीही मानवात भेदभाव केला नाही.त्यांनी महिलांचा आदर सन्मान केला. मुलगी देखील मुलाप्रमाणे बुद्धिवान, कर्तृत्ववान असते तिच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे, ती मुलाप्रमाणे वंशाचा दिवा असते असे महापुरुष म्हणतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या वेळी स्वच्छतेचे अतिशय चांगले काम करणाऱ्या नगरपरिषद मधील चाळीस महिला कर्मचाऱ्यांना जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम स्थळी साडी वाटप करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम शेळके यांनी केले, प्रस्ताविक एम एम जाधव तर आभार अनिल जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि मोहन घोरपडे, आर के नेलवाडे,विशाल जोळदापके,ईश्वर पाटील,अजय मोरे,डी. बी. बरमदे,डॉ. उद्धव जाधव, डी बी गुंडुरे,दत्तात्रय बाबळसुरे,विनोद सोनवणे, प्रमोद कदम,अमरदीप पाटील,किरण धुमाळ, आनंद जाधव, अर्चना जाधव, रंजना जाधव, राजश्री शिंदे, लता जाधव,नम्रता हाडोळे, वैशाली इंगळे, सुनीता बरमदे,बरमदे डी. एन, बाळासाहेब बिराजदार, ऍड तिरुपती शिंदे, संभाजी क्षीरसागर, शिवाजी भदरगे, प्रताप सोमवंशी,महेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.