पिकविमा नुकसान झाल्याप्रमाणत मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन- आण्णासाहेब मिरगाळे.
निलंगा: निलंगा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी खरीप 2022 चा पिकविमा भरलेला आहे. ज्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविमा मिळत नाही. नुकसान झाल्या प्रमाणात विमा मिळावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.
निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यामध्ये खरीप 2022 चा पीकविमा लाखो शेतकऱ्यांनी भरला आहे. सोयाबीनची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी दुबार व तीबार केली असून अतिवृष्टीमुळे उरले सुरले सोयाबीन पूर्णतः पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांनी जेवढा लागवड खर्च घातलेला आहे तेवढे सुद्धा उत्पन्न झालेले नाही. एका पिशवीला जवळपास तीन ते चार पोते सोयाबीन निघत आहे. एका हेक्टरला जवळपास 20 हजार रुपये खर्च येत असून उत्पन्न पाहिले असता पाच ते सहा हजाराचे उत्पन्न निघत आहे मारुती गणपती मिरगाळे या शेतकऱ्यांने सर्वे नंबर 309 मध्ये सोयाबीन हे एक हेक्टर व तुर ते 33 आर लावले असता त्यावर विमा 2386 भरले असता खात्यावर फक्त 916.37 पैसे पडले असून हा शेतकऱ्यावर अन्याय नाही का? हा प्रश्न लाखो शेतकऱ्यासमोर पडला आहे. एकच गावात सोयाबीनवर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 2000 काही शेतकऱ्यांच्या चार हजार तर काही शेतकऱ्यांना 12000 असा पिक विमा खात्यावर पडला आहे. त्या गावात अतिवृष्टी तर सारखी झाली आहे, नुकसान तर सारखे झालेले आहे पण एकाच हेक्टरवर नुकसानीची पैशांमध्ये तफावत कशी, पंचनामा करणाऱ्या प्रतिनिधींनी एकाच गावात नुकसानीची टक्केवारी वेगवेगळी कशी काय लावली हा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे. पाऊस तेवढाच, नुकसान तेवढेच पण पिकविम्याच्या पैशांमध्ये फरक कसा काय ? विमा प्रतिनिधींनी जाणीवपूर्वक शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान केलेले असून सोयाबीनचे 80 ते 90 टक्के नुकसान झाले असून कंपनीच्या नियमानुसार शंभर टक्के नुकसान झाले असेल तर हेक्टरी 54000 पीकविमा मिळाले पाहिजे व शेतकऱ्याचे 80 टक्के नुकसान झाले असून पिक विमा कंपनीच्या नियमानुसार शेतकऱ्यास प्रति हेक्टरी 45 हजार रुपये पिकविमा मिळायला पाहिजे. पिक विमा कंपनीने हेक्टरी 45 हजार रुपये पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अन्यथा शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे. सोबत संतराम वाघमारे, बालाजी गिरी, इंचुरे, घारोळे साहेब इत्यादी उपस्थित होते.