सर्वधर्मीय जयंती उत्सव समिती च्या वतीने शेर – ए- हिन्द हजरत शहीद टिपु सुलतान यांच्या जयंती निमित्त मुशायरा कार्यक्रम संपन्न
निलंगा:-येथील सर्वधर्मीय जयंती उत्सव समिती व मरहूम अब्दुल खादरपाशा देशमुख यांच्या स्मरणार्थ मुशायरा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मंचावर सर्वधर्मीय धर्मगुरु व सामाजिक व जेष्ठ नागरिक यांनी दीपप्रज्वलन व हजरत शेर-ए-हिंद टिपू सुलतान,महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,मरहूम अब्दुल खादर पाशा देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सर्व धर्मगुरू व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यात प्रमुख अतिथी म्हणून नाथपिठाचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर,दादापीर दर्गाचे सजादा नशीन हैदरवली कादरी, बसव मठाचे चंदनशिव येरटे महाराज, पिरपाशा दर्गा चे सज्जादा सय्यद युसूफ जानी कादरी, जेष्ठ विधीज्ञ अनंतराव सबनीस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते केरनाथ अप्पा सुर्यवंशी,जेष्ठ समाज सेवक लिंबन महाराज रेशमे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव धुमाळ, प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके , शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद आर्य, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता चोपणे, विलास माने, टि. टि.माने,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ,आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गुरुबाबा महाराज औसेकर यांनी बांधलेल्या हिरव्या फेटयाबाबत म्हणाले की,आमच्या घराण्यावर पिरपाशा कादरी यांची कृपा दृष्टि आहे.त्यांनी दिलेला हा हिरवा फेटा आमची चौथी पिढी बांधत आहे. त्यांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे. येथे सर्वधर्माचे लोक नतमस्तक होतात. व एक दुसर्याचे उत्सव मिळुन साजरा करतात ही आमच्या सर्वधर्म समभावाची संस्कृती आहे. हैदरवली दर्गाचे साहेब म्हणाले की,हजरत टिपु सुलतान हे स्वातंत्र्यच्या लढ्यातील हे पहिले योद्धे आहेत.तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे काल ही आदर्श होते,आजही आहेत,येणाऱ्या पिढ्यानपिढया आदर्श राहतील.काही चुकीच्या लोकांनी महापुरुषांबद्दल चुकीचा इतिहास लिहिला आहे. असे ते म्हणाले. सर्वधर्मीय जयंती उत्सव समीती सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्वच महापुरुषांचे कार्य व सत्य इतिहास जनतेसमोर मांडत आहे. हा फार स्तुत्य उपक्रम आहे. हे कार्य आजच्या घडीला राष्ट्रीय एकता व अखंडता साठी फार गरजेचे आहे. येरटे महाराज म्हणाले की आपल्या शहरात सर्वधर्मीय जयंती समीती सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जे कार्य करीत आहे यामुळे महापुरुषांचा खरा इतिहास जनतेसमोर आला आहे.जे राष्ट्रीय एकता व एकात्मता शांति व भाईचारा स्थापित करण्यासाठी आवश्यक आहे.या ठिकाणी देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतून,विविध भागातून आलेल्या शायरानी लोकशाही धोक्यात येत असल्याने,संविधान जिवंत ठेवणे ही भारतातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.आई -वडिलांचा आदर, शांती,सद्भाव असे देशाच्या व समाजाच्या विविध समस्यांवर विस्तृत प्रबोधन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे नेते पंडित धुमाळ,तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, रहेमानिय तालीमी सोसायटीचे अध्यक्ष हाजी मंजूर अहेमद देशमुख, सचिव फारुख देशमुख, शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख विनोद आर्य, प्रदेश सचिव अभय साळुंके, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, डाॅ. अरविंद भातंब्रे, अंबादास जाधव,राठोडा सरपंच पंकज शेळके,ओ.बी.सी.नेते दयानंद चोपणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, माजी सभापती अजीत माने, तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, सरपंच लाला पटेल, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, सामाजिक नेते रजनीकांत कांबळे, रिपाइं नेते विलास सुर्यवंशी, रिपाइं आठवलेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, बौध्द महासभेचे रोहित बनसोडे, सिराज देशमुख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे,चक्रधर शेळके, जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील,अल्पसंख्याक काँग्रेसचे असगर अन्सारी,युवा सेना समनव्यक दत्ता मोहळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम, हजरत टिपूसुल्तान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, ता. अध्यक्ष सबदर कादरी,शहराध्यक्ष बाबा बिबराले,तुराब बागवान,युवा सेनेचे ता.प्रमुख प्रशांत वांजरवाडे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, लहुजी सेनेचे गोविंद सुर्यवंशी, गणराज्य संघटनेचे रामलिंग पटसालगे, वंचितचे सुनील सुर्यवंशी, व कार्यक्रमात उत्कृष्ट कविता सादर करणारे देवदत्त सुर्यवंशी आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अशोकराव पाटील मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे यानी केले व आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लद्दाफ यानी केले.