पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन
निलंगा : प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील औराद शहा येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले मुलीचा शोध लागला नाही म्हणून शेर-ए- हिंद शहीद टिपू सुलतान संघटना, व नातेवाईकांतर्फे चक्क औराद पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वरील विषयी सविस्तर माहिती अशी की औराद येथील एका अल्पवयीन मुलीस एका गाव गुंड वृत्तीच्या नराधमाने अडीच महिने पूर्वी फूस पळवून नेले असून तब्ब्ल अडीच महिन्यानंतर ही काहीच तपास लागला नाही व सोबतच ज्याच्या वर खात्रीशीर संशय आहे त्याच्यावर गुन्हा नोंद न करता अनोळख्या व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी तक्रार का दाखल केली याचा जाब विचारत पोलीस स्टेशन समोरच धरणे आंदोलन करण्यात आले.
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या वर तत्काळ पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावं अशा मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले सदरील निवेदनावर शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर,शिवसेना (उबाठा) उप तालुका प्रमुख मुस्तफा शेख,शिवसेना रब्बानी सौदागर,काँग्रेस अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सईद सय्यद, टिपू सुलतान संघटना शराध्यक्ष बाबा बिबराले,आमीन अत्तार,समीर शेख, माजिद सय्यद,जावेद सय्यद,खुर्राम अड्डेवाले,सैलानी शेख,इम्रान सय्यद,युसूफ मोमीन,सलमान पठाण,अतिक पटेल,युसूफ मेकॅनिक,महेबूब अन्सार,वसीम इनामदार,जिलानी नाईकवाडे, मोसीन बडूरे,इम्रान पठाण,मोसीन शेख,इरफान पठाण,वाल्मिक नाईकवाडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.