लिंबन महाराज यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम……… कार्यकर्ता बैठकीत दिनकर माने यांच्याकडून रेशमे यांच्या कार्याचे कौतुक
निलंगा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण असा मुलमंत्र दिला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे काम सुरू असून येथील जेष्ठ शिवसैनिक लिंबन महाराज रेशमे मात्र १०० टक्के समाजकारण करण्याचे काम ते करत आहेत. जातपात पक्ष संघटना न पाहता प्रत्येक गरजूंना कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करुन रेशमे महाराज सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिनकर माने यांनी केले.
निलंगा येथील जनसेवा स्नेहालय येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, जेष्ठ शिवसैनिक लिंबन महाराज रेशमे, उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, राहुल मातोळकर, जयश्रीताई उटगे, भागवत वंगे आबासाहेब पवार, संजय उजळंबे अदी उपस्थित होते. पुढे बोलताना दिनकर माने म्हणाले रेशमे महाराज यांनी मतदारसंघाचा काहीही संबंध नसताना केवळ ग्रामस्थांची आडचण पाहून औसा तालुक्यातील कार्ला कुमठा येथील रस्ता स्वखर्चाने करुन दिला. जिल्ह्याभरातील अनेक मंदीराला निधी असेल बोअर पाडून पाणी टंचाई दूर करणे असेल अनेकांची दवाखान्याची कामे असतील असे आनेक कामे कोणताही राजकीय हेतू न ठेवता केली. त्यांच्या सारखी दानशूर माणसे खूप कमी पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने राजकारणातील संत म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. आजकाल प्रलोभने दाखवली की लगेच माणस निष्ठा बदलत असतात. मलाही पक्ष बदलण्याची आॅफर आली पण माझ्यासारख्या सायकलची हवा मारणाऱ्या व्यक्तीला बाळासाहेबांनी व उध्दव साहेबांनी आमदार केले त्यांच्यामुळे आपले नाव झाले त्यांच्याशीच बैमानी करणे आम्हच्या रक्तात नाही शेवटच्या श्वासापर्यंत उध्दव साहेबांच्या सोबत ठामपणे उभे राहण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे माने यांनी ठणकावून सांगत देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे. देशाचे संविधान संकटात सापडला आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहीजे. भविष्यात निवडणूका होतील का नाही याबाबत शाशंका असल्याने सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी लिंबन महाराज रेशमे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, सुत्रसंचलन प्रा आण्णासाहेब मिरगाळे यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या रेखाताई पुजारी, दैवता सगर, व्यंकटराव पांचाळ सुनिल नाईकवाडे, मुस्तफा शेख, प्रशांत वांजरवाडे, धनराज भुरके, गफार लालटेकडे अदीसह पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माने साहेबांची जबाबदारी माझ्यावर….. लिंबन महाराज
जनसेवा स्नेहालयाच्या माध्यमातून आम्ही जातपात मतदारसंघ न पाहता आडचणीत सापडलेल्या प्रत्येक नागरिकांना मदत करण्याचे काम आम्ही करत आहोत. नागरिकांना मदत देणारे आम्ही नाहीत तर ती प्रभूची आहे केवळ आम्ही देण्याचे माध्यम आहोत. दिनकर माने हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्यासाठी निलंगा तालुक्यातील ६८ गावची जबाबदारी मी स्वतः घेत आहे असे लिंबन महाराज रेशमे यांनी जाहीर करत लोकशाहीत जनता हि मालक आहे आपण निवडून दिलेले नेते हे सेवक आहेत मात्र सेवकच मालकासारखे वागत आहेत. आमची लढाई जनतेला मालक करण्यासाठीची आहे. ती लढाई आम्ही कायम लढत राहू आणि कार्यकर्त्यांना भक्कम बळ देऊ असे अभिवचन त्यांनी दिले.