श्रद्धा वालकर सारखी आणखी एक घटना घडली आहे. आई-मुलाने मिळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने महिला आणि तिच्या मुलाला अटक केली आहे. मुलाने आईसह वडिलांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे सांगण्यात येत आहे
माय-लेकाने मिळून केली हत्या
काही दिवसांपूर्वी श्रद्धाच्या हत्येच्या बातमीने दिल्ली हादरली होती. आता ही नवी घटनाही धक्कादायक आहे. पूनम आणि दीपक दास अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे मानवी अवयव अंजन दास याचेच असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी पूनम ही अंजन दासची पत्नी आहे, तर दीपक सावत्र मुलगा आहे. दोघांवर अंजनच्या हत्येचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजन दासचे अनेक महिलांशी अवैध संबंध होते. हे त्याच्या पत्नी आणि मुलाला समजताच अंजनला मद्यात नशेच्या गोळ्या देण्यात आल्या, त्यानंतर माय-लेकाने अंजनचे चाकूने मृतदेहाचे तुकडे करून अनेक ठिकाणी फेकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पूनमचे हे पहिले लग्न नव्हते, तिची यापूर्वीही दोन लग्न झाली होती.
पोलिसांना मिळाले सीसीटीव्ही फुटेज
मिळालेल्या माहितीनुसार या माय-लेकाने मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मृतदेह खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवला होता. वडिलांच्या वागण्यामुळे आई-मुलगा नाराज असायचे. वृत्तानुसार, मृत अंजनचे इतर महिलांसोबत संबंध होते, त्यामुळे कुटुंब चिंतेत होते. अंजनच्या दारूच्या व्यसनामुळे आई आणि मुलगाही हैराण झाले होते. 30 मे रोजी पोलिसांच्या तपासात मानवी अवयव सापडले होते. या प्रकरणी पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेजही मिळाले होते, ज्याच्या आधारे सहा महिन्यांच्या तपासानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आता पोलीस अंजन दासचे डीएनए प्रोफाइलिंग करणार आहेत.