• Fri. May 2nd, 2025

रिलायन्स गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील; मुकेश अंबानींचं मोठं वक्तव्य

Byjantaadmin

Jan 10, 2024

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती यांनी गुजरातला मातृभूमी आणि कर्मभूमी म्हटलं आहे.रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील, असं मोठं वक्तव्यमुकेश अंबानी यांनी केलं आहे. गुजरात ही आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असल्याचं वक्तव्य रिलायन्सचे  चेअरमन मुकेश अंबानी यांनी केलं आहे. वायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 (Vibrant Gujrat Global Summit 2024) या कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

Reliance was is and will always remain a Gujarati company Mukesh Ambani at Vibrant Gujarat Summit 2024 business marathi news Mukesh Ambani : रिलायन्स गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील; मुकेश अंबानींचं मोठं वक्तव्य

मुकेश अंबानी यांचं मोठं वक्तव्य

गुजरातला आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असल्याचं सांगत मुकेश अंबानी यांनी म्हटलं की , गेल्या 10 वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, यापैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे. गुजरातमधील रिलायन्सची गुंतवणूक पुढील 10 वर्षे सुरू राहील आणि 2030 पर्यंत गुजरातच्या एकूण हरित ऊर्जेच्या वापरापैकी निम्मी ऊर्जा त्यांची कंपनी तयार करेल, ही मोठी घोषणा अंबानी यांनी केली आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.

 

“रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि कायम राहील”

मुकेश अंबानी यांनी यावेळी म्हटलं की, “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील. रिलायन्सने गेल्या 10 वर्षांत संपूर्ण भारतात जागतिक दर्जाची मालमत्ता आणि क्षमता निर्माण करण्यासाठी 150 अब्ज डॉलर्स म्हणजे 12 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत, त्यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक गुजरातमध्ये झाली आहे.

”नवीन भारत म्हणजे नवा गुजरात”

अंबानी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हटलं आहे की, “मी गेटवे ऑफ इंडियाच्या शहरातून आधुनिक भारताच्या विकासाच्या प्रवेशद्वारावर आलो आहे, जे गुजरात आहे. मी गुजराती असल्याचा, मला अभिमान आहे. जेव्हा परदेशी लोक नवीन भारताचा विचार करतात, तेव्हा ते नवीन गुजरातचा विचार करतात. हे परिवर्तन कसं घडलं? एका नेत्यामुळे, जो आपल्या काळातील सर्वात महान जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे. पंतप्रधान मोदी, भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत.”

 

देश-विदेशातील दिग्गज नेत्यांची हजेरी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात 2024 कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं. गुजरातची राजधानी गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींसोबत यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेटर फियाला, मोझांबिकचे राष्ट्रपती फिलिप जॅसिंटो न्युसी, तिमोर-लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस होर्टा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य, देवव्रत आणि दिग्गज नेते यांच्यासह देशभरातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *