• Fri. May 2nd, 2025

टवेन्टिवन शुगर्स कडून सभासद आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसलागवड योजना – २०२४

Byjantaadmin

Jan 9, 2024

टवेन्टिवन शुगर्स कडून सभासद आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसलागवड योजना – २०२४

• या योजनेतील ऊसाचे गाळप १२ महीन्यात होणार
• एफआरपी पेक्षा प्रतिटन १०० रू जादा ऊसदर
लातूर प्रतिनिधी : ९ जानेवारी २०२४ : टवेन्टिवन शुगर्स, मळवटी ता.जि.लातूर येथील साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी सन २०२४-२५ या गळीत हंगामाकरीता ऊसलागवड योजना राबविणार आहे. या योजनेअंतर्गत को. ८६०३२, एम.एस.१०००१, कोसी.६७१, कोव्हीएसआय ०८००५, , कोव्हीएसआय १८१२१ या सुधारीत जादा साखर उतारा देणाऱ्या मान्यताप्राप्त जातींच्या उसाची लागवड फेब्रुवारी २४ ते मार्च २४ मध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता कारखान्यातर्फे गाळपास आलेल्या ऊसास एफआरपी पेक्षा प्रतिटन १०० रू जादा ऊसदर देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पुढील गळीत हगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड होऊन गाळप क्षमते इतका ऊस निर्माण होण्यासाठी ऊस लागवड योजना – २०२४ जाहीर केली आहे. टवेन्टिवन शुगर्स, मळवटी ता. लातूर येथील साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत लागवड ऊसाचे १२ महीन्यात गाळप करून ऊसाला प्रतिटन १०० रूपये एफआरपी पेक्षा अधिक ऊसदर देण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त सभासद व ऊसउत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या ऊसलागवड योजना २०२४-२०२५ अंतर्गत कार्यक्षेत्रातील सभासद व सर्व
ऊसउत्पादकासाठी आहे. या योजनेत लागवड केलेला ऊस गाळपास आल्यानंतर प्रति टनास रु. १०० एफ.आर.पी. पेक्षा जादा ऊस दर देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना किमान ०.४० आर क्षेत्रावर ऊस लागवड करावी लागणार आणि कमाल ऊस लागवड क्षेत्राची अट नाही. या योजनेत सहभाग घेणेसाठी कारखान्यासोबत रितसर करार लागेल. या योजनेसाठी १ फेब्रुवारी २४ ते ३० मार्च २४ या कालावधील ऊस लागवड करण्यात यावी. योजनेसाठी को. ८६०३२, एम.एस.१०००१, कोसी.६७१, कोव्हीएसआय ०८००५, कोव्हीएसआय १८१२१ या सुधारीत वाणाच्या जातींची उसाची लागवड करावी. या योजनेत लागवड केलेला ऊस पुढील हंगामात गाळपास घेणेची हमी कारखान्याची राहिल. (अवघ्या 12 महिन्यात ऊस गाळपास येईल.) ऊस बेणे किंवा ऊस रोपाने लागवडीस मान्यता असेल. ऊस पिकाकरीता ऊस वर्धक व्ही. एस. आय. दरात वसंत ऊर्जा कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. केवळ एम. स. 10001 ऊस जातीचे ५० टक्के रक्कम भरणा करणाऱ्यास उर्वरित ५० टक्के रक्कम उधारीवर ऊस रोपे पोहच करण्यात येतील. टवेन्टिवन शुगर्स कडून येणाऱ्या हंगामासाठी जाहीर झालेल्या या योजनेत जास्तीत जास्त सभासद व ऊसउत्पादकांनी सहभाग घ्यावा. या योजनेत सहभाग घेण्यासाठी आपल्या विभागातील गट कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *