मुंबई: राज्यातील टोल नाक्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या राज ठाकरे आज थेट खालापूर टोल नाक्यावर स्वतः उतरले आणि त्यांनी ठाकरे शैलीत ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता रिकामा करून दिला. पुण्यावरून mumbaiला येताना ट्रॅफिक जॅममुळे राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिल्याचं दिसून आलं.