• Wed. Apr 30th, 2025

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वीतीय पुरस्कार  मांजरा कारखान्यास जाहीर

Byjantaadmin

Jan 7, 2024
उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वीतीय पुरस्कार  मांजरा कारखान्यास जाहीर
 विलासनगर लातूर -वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे या संस्थेकडून राज्य पातळीवरील उत्तर पूर्व विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार  राज्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या लातूर विलासनगर येथील  विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास नुकताच जाहीर झाला आहे.लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या अथक परिश्रमातून व दूरदृष्टीच्या नियोजनातून माळरानावर मांजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून नंदनवन फुलले आहे. लाखो शेतक-यांच्या जिवनात आर्थिक क्रांतीचे नवे पर्व सुरू करून सहकार क्षेत्राचा उद्देश मांजरा कारखाना नेतृत्वाने व संचालक मंडळाने सफल करून दाखवला आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय  दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धिरजजी देशमुख साहेब यांच्या कुशल  मार्गदर्शनाखाली कारखान्याने आजतागायत सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडून एक आदर्श निर्माण केला आहे.
मांजराची दैदिप्यमान कामगिरी
मांजरा कारखान्याच्या आज पर्यंतच्या दैदिप्यमान कारकिर्दीत राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कार देवून कारखान्यास गौरवण्यात आले आहे. कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये मिल मधील उसाचा तंतूमय निर्देशांक, रिडयुस्ट मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ, गाळप क्षमतेचा वापर,तसेच  इतर निकष पाहता सदरील पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे. मांजरा साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यासंस्थेच्या वतीने गळीत हंगाम 2022-23 या सालातील सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता द्वीतीय पुरस्कार मिळाल्याबददल कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री  दिलीपरावजी देशमुख साहेब,सन्माननीय संचालक माजी मंत्री आ. अमितजी देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धिरजजी  देशमुख कार्यकारी संचालक तसेच संचालक मंडळ  अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांकडुन अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *