निलंगा तालुक्यातील हजारो मराठा बांधव पायीदिंडीत सहभागी होणार – सकल मराठा समाजाचा निर्धार.
निलंगा/प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी २० जानेवारी रोजी अंतरवाली ते मुंबई पायीदिंडी काढण्याचा निर्णय मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या पायीदिंडी ला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज जाणार असा निर्धार शासकीय विश्रामगृह निलंगा येथील झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र लढा उभा केला आहे.राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना २४ डिसेंम्बर पर्यंतचा वेळ मागितला होता चोवीस डिसेंम्बर पर्यंत आरक्षण देऊ असा शब्द देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने तो शब्द न पाळल्यामुळे २० जानेवारी रोजी अंतरवाली ते मुंबई पायीदिंडी काढून मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केलेला आहे.मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निलंगा तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असा निर्धार सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आला आहे. या बैठकीसाठी निलंगा तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.