• Wed. Apr 30th, 2025

पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष महिला रोजगार मेळाव्याचे लातूर येथे बुधवारी आयोजन

Byjantaadmin

Jan 5, 2024

पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष महिला रोजगार मेळाव्याचे लातूर येथे बुधवारी आयोजन

 

लातूर दि. 5 (जिमाका):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि लातूर येथील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष महिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे हा मेळावा होणार असून यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर येथील एकूण 12 आस्थापना, उद्योजक यांनी एकूण 209 रिक्त पदे अधिसूचित केली आहेत.

लातूर येथील विश्व सुपर बाझारमध्ये अकाऊटंन्ट, सुपरवाझर, ऑपरेटर, हेल्परच्या 20 जागा असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, टॅली, एमएस-सीआयटी अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. लातूर येथील देवराज ट्रेनिंग आणि रिक्रूटिंग या आस्थापनेत सेल्स एक्झीक्युटीव्ह, बॅक ऑफिस, लाईनवर्कच्या 30 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी इयत्ता बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय अशी शैक्षणिक पात्रता आहे. लातूर शहरातील ओम ॲटोमोटिव्ह यमाहा शोरूममध्ये मॅनेजर,  रिसेप्शनिस्ट, सेल्सगर्ल या 05 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी इयत्ता बारावी, कोणतीही पदवी आवश्यक आहे. शहरातील लातूर मार्टमध्ये अकाऊटंन्ट 2 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी बारावी,  कोणतीही पदवी, टॅली अशी पात्रता आवश्यक आहे. तसेच लातूर शहरातीलच डी.के.इन्फोटेकमध्ये टिचर, काऊंन्सलरच्या 2 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी कोणतीही पदवी,  एमबीए अशी पात्रता आवश्यक आहे.

लातूर शहरातील इक्वीनॉक्स टेक्नोलॉजीमध्ये अकाऊटंन्ट, सर्व्हिस इंजिनिअर, सेल्स एक्झीक्युटीव्हच्या 10 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी पदवी, इलेक्ट्रॉनिक्स,  इलेक्ट्रीशिअन, टॅली अशी पात्रता आवश्यक आहे. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)मध्ये  प्रतिनिधीच्या 10 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता आवश्यक आहे. मुंबई येथील निट लि.आयसीआयसीआयबँक) साठी रिलेशनशिप ऑफिसरच्या 20 जागांसाठी भरती होणार असून यासाठी कोणतीही पदवीधारक उमेदवार पात्र आहेत. पुणे येथील टॅलेंट सेतू सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये ट्रेनीच्या 20 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी आयटीआय (सर्व ट्रेड) किंवा मेकॅनिकल तथा ॲटोमोबाईल डिप्लोमा,  बी.ई. पदवीधारक उमेदवार पात्र आहेत. पुणे येथील क्वेसकॉर्प लि. (टाटा मोटर्स पुणे)मध्ये ट्रेनीच्या 30 जागांसाठी मुलाखती होतील. यासाठी बारावी  सायन्सं, आयटीआय (सर्व ट्रेड), डिप्लोमाधारक उमेदवार पात्र आहेत. पुणे येथील महाले आनंद इंडिया, दणा आनंद इंडिया, गाब्रिल इंडिया प्रा. लि. मध्ये अप्रेंटिस ट्रेनीच्या 30 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी आयटीआय (सर्व ट्रेड) उमेदवार पात्र आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील धुत ट्रान्स मिशन प्रा. लि. मध्ये अप्रेंटिस ट्रेनीच्या 30 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी बारावी, एमसीव्हीसी, कोणतीही पदवी, डिप्लोमाधारक उमेदवार पात्र आहे. तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख आस्थापनांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.या नामांकीत आस्थापना, उद्योजक यांनी या कार्यालयाकडे रिक्तपदे अधिसुचित केली आहेत. यासाठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, आयटीआय (सर्व ट्रेड), डिप्लोमा तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

सर्व रिक्तपदेनिहाय इच्छूक उमेदवारांनी 10 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10 वाजता लातूर येथील बार्शी रोडवरील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत: चा रिझ्युम / बायोडाटा / पासपोर्ट फोटो इ. (पाचप्रती) सह उपस्थित रहावे. लातूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed