जिल्हा बँकेच्या ३४ सभासदांच्या वारसांना १ कोटी २६ लाख रुपये धनादेशाचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले वितरण
लातूर -शेतकरी बांधवांच्या आर्थिक परिवर्तनाचे केन्द्र समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेती सहकारी संस्था अंतर्गत कर्जदार शेतकय्रांना विम्याचे संरक्षण मिळावे या हेतूने जनता अपघात वीमा योजना स्वीकारली आहे या योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळालेला असून या योजने अंतर्गत ५८६ प्राथमिक शेती संस्थांचे २,४९,०७७ सभासदांचा बँकेने जनता अपघात विमा उतरवला असुन अपघात विमा योजनेअंतर्गत ३४ मयत सभासदांच्या वारसांना १ कोटी २६ लाख रुपयांचा धनादेश द्वारें लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी बँकेच्या मुख्यालयात वितरण करण्यात आले .आजतागायत बँकेने जिल्ह्यांतील एकूण १२८६ मयतांच्या वारसांना १६ कोटी ८१ लाख रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ तसेच मयताचे वारस उपस्थित होते.