लातूर जिल्हा बँकेच्या दिनदर्शिकेचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन
लातूर -राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आशियाना बंगल्यावर करण्यात आले .
यावेळीलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख, बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव बँकेचे जेष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ,संचालक अशोक गोविंदपूरकर,, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, जयेश माने, राजकुमार पाटील, संचालिका सौ सपना कीसवे, अनुप शेळके जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे , सचिन दाताळ, संभाजी सुळ संभाजी रेड्डी, शिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते
तत्पूर्वी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व बँकेने काढलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेची माहिती दिली. कार्यक्रमास बँकेचे अधिकारी कर्मचारी ईतर मान्यवर उपस्थित होते