शिरूर अनंतपाळ, रेणापूर नगरपंचायतीसाठी प्राप्त ई-घंटागाडीचे लोकार्पण
लातूर, (जिमाका): शिरूर अनंतपाळ नगरपंचायत आणि रेणापूर नगरपंचायतीसाठी घनकचरा व्यूवस्थापनासाठी आयसीआयसीआय बॅंकेच्या आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत प्राप्त झालेले ई- घंटागाडीचे लोकार्पण जिल्हाआधिकारी कार्यालय येथे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले.
नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, शिरूर अनंतपाळच्या नगराध्यक्ष मायावती गणेश धुमाळे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, आयसीआयसीआय बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख राजीव दुबे, लातूर गव्हटर्नमेंट बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख विकास देशमुख, विकास अधिकारी वैभव बन्नीगरे, लातूर गव्हपर्नमेंट बॅंकेचे मॅनेजर राजकुमार मुळे, उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता व आरोग्य सभापती सुषमाताई बस्वराज मठपती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.इलेक्ट्रिक स्वरुपाची घंटागाडी नागपंचायतीला प्राप्त झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून पर्यावरण संवर्धनासही मदत होईल, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.