टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूची भरली शाळा : गुलशन अतफाल उर्दू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील चिंचोली सयाखान येथील गुलशन अतफाल उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवून मोठे प्रदर्शन भरवले होते.चौथी ते आठवी शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल,बैलगाडी,टपाल बाॕक्स,फुले,फुलदानी,चंद्रयान, मोबाईल स्टँड,यासह संसार उपयोगी शेकडो वस्तू बनवून कला दालनात ठेवल्या होत्या.अतिशय सुंदर आणि कलाकुसरतेने बनविलेल्या वस्तू पाहण्यासाठी पालक , नागरिक महिला पुरूष यानी मोठी गर्दि केली होती.आलेल्या नागरिकांनी सर्व विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतूक केले व शब्बासकीची थाप ही दिली.ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत एवढे मोठे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन भरल्याने भरल्याने चिंचोलीसह परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.
इंग्रजी व कला शिक्षक रिजवान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील ४ ते ८ प्रर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू संग्राहालय प्रदर्शनात सहभाग घेतला होता.कला शिक्षक रिजवान शेख यानी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर हस्तकला व त्याचे फायदे लक्षात घेऊन अनेक वेळा अशा वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या हस्तकला प्रदेशासाठी मुख्याद्यापक निसार पठान,मुनीरूद्दिन शेख,हिना कौसर,संगमेश्वर मोतिपवळे,विकास पवार,नबी अशीफ,हादि सय्यद,शेख अस्लम,इतर शिक्षक आणि शाळेचे सेवक सतीश सावळसुरे यांचे मोलाचे योगदान लाभले.