कॉक्सिट’च्या जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
लातूर, दि.३१- येथील कॉक्सिट महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील दोन विद्यार्थिनींनी नांदेड येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यांची नाशिक येथे होणार्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
‘कॉक्सिट’च्या निकिता नागनाथ मोरे हिने ‘ऍॅसिटोबॅक्टर’ या जैविक खताबद्दल तर कांचन राजकुमार शेट्टी हिने अल्झायमर रोगाच्या प्रतिबंधासाठी ‘म्युझिक थेरपी’ या विषयावर विद्यापीठस्तरीय स्पर्धेत आपले संशोधन सादर केले. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी या विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘कॉक्सिट’चे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, तज्ज्ञ संचालक एन. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर कैलास जाधव, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. ईश्वर पाटील व प्रा. शरद गंगावणे उपस्थित होते.
कॉक्सिट’च्या जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
