बोरसुरी साठवण तलावास मिळाली प्रशासकीय मान्यता ८२.७४ कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी, माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा
लातूर प्रतिनिधी:- निलंगा मतदारसंघात सिंचन क्षेत्र वाढावे व शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटावा यासाठी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात. या प्रयत्नातूनच निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथे साठवण तलाव उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो मान्य व्हावा याकरीता पाठपुरावा केलेला होता. या पाठपुराव्यातून बोरसुरी साठवण तलावास प्रशासकीय मान्यता मिळालेली असुन या साठवण तलावाच्या उभारणीसाठी ८२.७४ कोटी रूपयाच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता मिळालेली आहे. सदर मान्यता दिल्याबददल उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
साठवण तलावाच्या माध्यमाततून सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होवून त्यांचा फायदा शेतक-यांना तसेच पिण्याच्या पाण्यास व्हावा याकरीता माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर कायमच प्रयत्नशील असतात. मतदारसंघात अधिकाधिक सिंचनक्षेत्र व्हावे याकरीता पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे तसेच साठवण तलाव उभारले जावेत याकरीताही माजीमंत्री आ.निलंगेकर पाठपुरावा करीत आहेत. या पाठपुराव्यातून निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथे साठवण तलाव उभारला जावा. याकरीता जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून तो मंजुर करण्यासाठी प्रयत्नशील होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बोरसुरी साठवण तलाव उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळुन याकरीता ८२.७४ कोटी रूपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी मिळालेली आहे.
बोरसुरी साठवण तलावाच्या माध्यमातून २.३४८ दलघमी पाणीसाठा होणार असल्याने ३५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर नजीकच्या ५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सदर बोरसुरी साठवण तलावास मान्यता मिळाल्याबददल जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचे बोरसुरी पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार व्यक्त केलेले आहेत.