सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते मांजरा कारखाना स्व-मालकीचे ऊस तोडणी यंत्राचे पुजन संपन्न.
विलास नगर:– विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे स्व-मालकीचे घेतलेले नवीन पाच पैकी सध्या उपलब्ध झालेले तीन ऊस तोडणी यंत्राचे पुजन राज्याचे माजी मंत्री तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील,मांजराचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,जागृती शुगरचे व्हा चेअरमन लक्ष्मण मोरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संतशिरोमणी कारखाना संचालक शाम भोसले, सचिन पाटील,विलास कारखाना संचालक अनंत बारबोले, गुरूनाथ गवळी, सचिन दाताळ, संभाजी सुळ, सतिश पाटील,शिवाजी कांबळे, श्रीकृष्ण काळे, विकास देशमुख, मांजरा कारखाना संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे,सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे,धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, बाबुराव जाधव, तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई,कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, अधिकारी, तसेच कारखान्याचे खाते प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब,माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात चालू गळीत हंगामात मांजरा परिवारातील सर्व कारखाने योग्य रित्या सुरू असून शेतकऱ्यांचा ऊस मशीन द्वारे मोठ्या प्रमाणात तोडला जात असल्याने गाळपास गती आले असल्याचे मांजरा कारखान्या कडून कळवण्यात आले आहे.