आता स्कूटर बॅटरी चार्जींगची चिंता सोडा…!
लेक्ट्रिक्स् ची इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी चार्जर स्वॅपिंग मशिन प्रथमच लातूरात
बिडवे मोटार्समध्ये आत्याधुनिक सेवेचा शुभारंभ
लातूर-भारतातील विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणार्या लेक्ट्रिक्स् ई.व्ही.इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने बॅटरी चार्जींगचा वेळ वाचविण्यासाठी बॅटरी चार्जींग स्वॅपींग मशीन लातूर शहरात प्रथमच बिडवे मोटार्स येथे लाँच केले आहे. या सुविधेमुळे बॅटरी चार्जींगसाठी लागणारा अधिकचा वेळ वाचणार आहे, अगदी काही मिनिटांत बॅटरी चार्ज करून मिळणार आहे . त्याचबरोबर कंपनीच्यावतीने बॅटरी मेंटनन्स, देखभाल करण्यात विनामूल्य येणार असून यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढणार असल्याचे लेक्ट्रिक्स् ई.व्ही. कंपनीचे सर्व्हिस हेड प्रसाद पाटील यांनी सांगितले.
या इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी चार्जर स्वॅपिंग मशिनचा शुभारंभ बिडवे लॉन्स लातूर स्थित बिडवे मोटार्स मध्ये रविवारी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरअप्पा बिडवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लेक्ट्रिक्स् इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीचे सर्व्हिस हेड प्रसाद पाटील, कंपनीचे महाराष्ट्राचे सेल्स मॅनेजर मनिष दलाल, सर्व्हिस इंजिइर कुणाल सुर्यवंशी, बिडवे मोटार्सचे मालक राज बिडवे, कालिका शिक्षण संस्थेचे संचालक श्रीकांत उटगे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार लखादिवे, अॅड.पाटील, सांगवे, धनंजय मिटकरी, प्रदिप खुरणे, विरभद्रप्पा वाले आदि मान्यवरांसह शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व ग्राहक उपस्थित होते.
लेक्ट्रिक्स ई.व्ही.कंपनीचे संपूर्ण देशात शंभर पेक्षा अधिक डीलर असून हे आणखीन वाढणार आहेत. विश्वसनीय इलेक्ट्रिक स्कूटर जगातात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता ग्राहकांसाठी स्वतः कंपनीने उत्पादन केलेल्या प्रॉडक्टमुळे माफक दरात चालणारी बॅटरी व इतर पार्टस उत्तम क्वालिटी उपलब्ध असल्याचे कंपनीचे सर्व्हीस हेड प्रसाद पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले. भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी चार्जर स्वॅपिंग मशिन ही लेक्ट्रिक्स ई.व्ही.कंपनीने निर्मिती केली आहे. स्कूटरस्वरांचा अधिकचा वेळ वाया जाणार नाही यासाठी कंपनीने तात्काळ चार्जर स्वॅपिंग अत्याधुनिक मशिन विकसीत केल्याचे ते म्हणाले. एकवेळ चार्ज केल्यास 100 किमी अंतर चालते. इतर कंपन्यांच्या बॅटर्या 10 अॅम्पीअर क्षमतेच्या आहेत. लेक्ट्रिक्सने 18 अॅम्पीअर क्षमतेची बॅटरी चार्जर विकसीत केल्यामुळे चार्जींग अवघ्या दोन ते तीन तासात फुल चार्ज होते. आता एकाचवेळी या स्वॅपींग चार्जर मशिनमध्ये सहा बॅटरी चार्ज करता येतात. येणार्या काळात याची क्षमता 9 ते 12 बॅटरी एकाचवेळी चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्कूटरस्वारांना कांही मिनिटातच फुल चार्ज झालेली बॅटरी मिळणार आहे. त्याचबरोबर सदरील चार्ज बॅटरी तात्काळ पाहिजे असल्यास बुकींगची सुविधाही उपलब्ध आहे असेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक स्कूटर उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम पर्याय- राज बिडवे यांची माहिती
बॅटरी स्वॅपिंग धोरणाला सरकारकडून लवकरच मान्यता मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जेणेकरून ईव्ही वाहन वापरकर्त्यांना त्यांच्या वाहनांची डिस्चार्ज झालेली बॅटरी रिचार्ज करण्यासाठी तासनतास वाट पाहण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळेल. स्वॅपिंग स्टेशनवर ड्रायव्हर त्यांच्या वाहनाची डिस्चार्ज झालेली बॅटरी चार्ज केलेल्या बॅटरी युनिटसह बदलू शकतील. ज्यामुळे चार्जिंगमध्ये वेळ वाचेल. ही समस्या लक्षात घेऊन, नीती आयोगाने बॅटरी स्वॅपिंगसाठी धोरणाचा मसुदा जारी केला आहे. जो सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.राज बिडवे याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, यामुळे प्रदूषण होणार नाही, पेट्रोलची मोठ्याप्रमाणात बचत होणार आहे आणि वेळ व पैसा वाचणार आहे.अशा चार्जिंगचे गावोगाव सबस्टेशन उभारले जातील यातून जनतेची सोय होणार आहे. एकूणच इलेक्ट्रॉनिक स्कूटर उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तमपर्याय असणार आहे यात शंकाच नाही असेही राज बिडवे यांनी सांगितले.