मुंबई : (Maratha Reservation) मागणीसाठी 20 जानेवारीला (Manoj Jarange) मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्टिव्ह मोडवर आहे. मनोज जरांगेंना रोखण्यासाठी लवकरच मुख्यमंत्रीEKNATH SHINDE मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आहे. आरक्षणासंदर्भात सर्व प्रशासकीय अधिका-यांकडून आढावा घेणार आहे.
समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत. आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. त्या अगोदरच जरांगेंना रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलंय? याचा आढावा करणार आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत. जरांगे पाटील यांना विश्वास देण्याचं काम सरकार करत आहे.
मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही : गिरीश महाजन
दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही, असे वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही. त्याआधीच एक महिन्याच्या आत पर्मनंट आरक्षण मिळेल. जलद गतीनं काम सुरु आहे. भुजबळांना विनंती केली आहे की, आपापसांत भांडू नका, टीका करुन दोन समाजात तेढ निर्माण करु नका.
20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार
मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत. आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून, दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे. सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे काही पारंपारिक खेळ आहे, असे खेळ आयोजित करण्यात येतील.
मुंबईकडे जातांना तीन तुकड्या केल्या जाणार…
मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांची नोंदणी करायला सुरुवात झाली आहे.MUMBAI कडे निघतांना तीन तुकड्या करण्यात येणार आहे. ज्यातील एका तुकडीत पिण्याच्या पाण्याची, डॉक्टर, जेवणाची सोय असणार आहे. सोबतच ढोल, हलक्या असे पारंपरिक गोष्टी देखील घेऊन आम्ही जाणार आहोत. आमच्यासोबत अंदाजे 10 लाख वाहनं असण्याची शक्यता आहे