निलंगा येथे दादापीर दरगाह उर्स
निलंगा-येथील हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह नबीरा कादरी उर्फ आलमारुफ दादापीर रहे. यांचा 412 वा उर्स शरीफ निमित्ताने जुलूस ए संदल कार्यक्रम दि 24 डिसेंबर रविवारी रात्री उशिरा संपन्न होत आहे .सोमवारी दि.25 रोजी उर्स जियारत माहेफिल समा तकरीर कवाली कार्यक्रम होईल.दि 26 मंगळवारी चिरागा महीफेल समा कवाली कार्यक्रम होणार आहे तर दि 27 डिसेंबर बुधवार रोजी खतम शरीफ कुराण वाचन,तकरीर कव्वाली समा रात्री 7 वाजता होऊन उर्स समारोप होईल अशी माहिती सय्यद शहा हैदरवली नबीरा कादरी सज्जदा नाशिन व मुतवली दादापीर दरगाह निलंगा यांनी दरगाह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.व भक्तांनी उर्स चा लाभ घ्यावा असे आव्हान केले.या वेळी नगर परिषदचे माजी सभापती इरफान सय्यद,रिपाइंचे अंकुश ढेरे आदी उपस्थित होते.