• Wed. Aug 13th, 2025

मराठा आरक्षणावर उपाय सापडला…प्रकाश आंबेडकर म्हणतात…

Byjantaadmin

Dec 19, 2023

महाराष्ट्रात मराठा आरक्षणा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणचा विषयावरुन राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झाले आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. मनोज जरांगे पाटील राज्यभरात सभा घेत असताना त्यांना उत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि इतर जण सभा घेत आहेत. राज्य सरकार या विषयावर अडचणीत आले आहे. राज्य सरकारने या प्रकरणी न्या. शिंदे समिती नेमली होती. त्या समितीचे दोन अहवाल आले आहेत. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरनंतर सरकारला मुदत देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. राज्यातील या वातावरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आपल्याकडे मराठा आरक्षणावर उपाय असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *