• Wed. Aug 13th, 2025

जो मेरा हो नही पाया वो तेरा… ; कविता ‘त्यांची’, व्यथा ठाकरेंची, टोला शिंदेंना

Byjantaadmin

Dec 19, 2023

पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने कवी कुमार विश्वास यांनी केलेली राजकीय फटकेबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी कवितेतून मांडलेली उद्धव ठाकरेंची व्यथा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सांगून जाते. ‘जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता’ असे सांगत एकनाथ शिंदेंविषयी कुमार विश्वास यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आणि आता याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

कविता सादर करण्यापूर्वी कुमार विश्वास यांनी कवितेचा विषय सांगितला. विनोद तावडे यांना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेविषयी समजावून सांगत आहेत. आता विषय स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचीच उत्कंठा वाढली. आणि ही उत्कंठा शमवण्याचे काम कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितेतून अगदी सहज केले. एकनाथ शिंदेंनी बंड करून शिवसेनेत फूट पाडली. आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. ही व्यथा उद्धव ठाकरे कवितेच्या माध्यमातून विनोद तावडेंना सांगत आहेत, असा कवितेचा आशय आहे…

‘बहोत तुटा बहोत बिखरा बखेडे सून नही पाया

हवाओं के इशारे पर मगर मैं बह नही पाया

अधुरा अनसुनाही रह गया यू प्यार का किस्सा

अधुरा अनसुनाही रह गया यू राज का किस्सा

कभी तुम सून नही पायें कभी मैं कह नही पाया

समंदर तीर का अंदर है लेकिन रो नही सकता

यह आसू प्यार का मोती हैं इसको खों नही सकता

मेरी चाहत को अपना तू बना ले ना मगर सुनले

जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता

कवी कुमार विश्वास हे राजकीय विडंबनासाठी जास्त ओळखले जातात. पुण्यात पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी कवितेतून माध्यमातून ही जोरदार राजकीय फटकेबाजी केली. काही दिवसांपासून विनोद तावडे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. याचे राजकीय भान राखत उद्धव ठाकरे तावडेंकडे त्यांची व्यथा मांडत आहेत, या कविकल्पनेवर कुमार विश्वास यांनी विनोद तावडेंच्या उपस्थितीतच ही कविता सादर केली. आणि या कवितेला पुणेकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *