• Wed. Aug 13th, 2025

IPL मध्ये सर्वाधिक २० कोटींची बोली, वर्ल्डकप विजेत्यासाठी हैदराबादने मोजली रेकॉर्डब्रेक किंमत

Byjantaadmin

Dec 19, 2023

दुबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी IPL 2024 Auction मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. गेल्या आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स या संघाने करनला १८.५० कोटी रुपये देत आपल्या संघात सहभागी केले होती. पण या आयपीएलमध्ये मात्र सर्वाधिक पैसे मोजले ते सनरायझर्स हैदराबादच्या संघाने. हैदराबदच्या संघाने यावेळी तब्बल १० पट जास्त किंमत मोजली आणि मॅचविनर खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले.

IPL 2024 Auction

ऑस्ट्रेलियाने यावर्षी वनडे वर्ल्ड कप जिंकला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला होता तो कर्णधार पॅट कमिन्सने. त्यामुळे कमिन्सचे नाव जेव्हा लिलावात घेतले तेव्हा त्याच्यावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावायला सुरुवात केली. चेन्नई आणि मुंबई यांच्यात यावेळी चांगलीच चुरस रंगली होती. पण काही वेळात मुंबईच्या संघाने माघार घेतली आणि त्यामुळे चेन्नईचा संघ आता कमिन्सला आपल्या संघात स्थान देणार, असे वाटत होते. पण त्यावेळी हैदराबादच्या काव्या मारनने यावेळी लिलावात एंट्री घेतली. त्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद यांच्यामध्ये बोली सुरु झाली. काही वेळात चेन्नईच्या संघानेही माघार घेतली. त्यामुळे आता कमिन्स हैदराबादच्या संघात जाईल, असे वाटत होते. पण त्यावेळी लिलावात एंट्री झाली ती आरसीबीच्या संघाची. त्यानंतर आरसीबी आणि हैदराबाद यांच्यामध्ये चांगलीच शर्यत रंगल्याचे पाहायला मिळाले. कारण हैदराबाद आणि आरसीबी या दोन्ही संघांनी कमिन्ससाठी मोठ्या बोली लावायला सुरुवात केली. त्यावेळी कोणताही संघ मागे हटण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे तब्बल १० पट रक्कम कमिन्सला मिळाली. हैदराबादने अखेर २० कोटी ५० लाख रुपयांची बोली कमिन्सवर लावली. त्यानंतर आरसीबीने माघार घेतली आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हैदराबादच्या संघाने घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *