• Tue. Apr 29th, 2025

रामदेव बाबा यांचं महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान; संतप्त रुपाली ठोंबरे म्हणाल्या…

Byjantaadmin

Nov 25, 2022

पुणे: महिला साडी आणि सलवारमध्ये चांगल्या दिसतात. त्यांनी काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात, असं आक्षेपार्ह विधान योग गुरू रामदेव बाबा यांनी केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे प्रचंड संतापल्या आहेत.  बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

महिलांनी काय घालायाचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे

महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचं विधान कितपत योग्य आहे? रामदेव बाबा डोकं खाली आणि पाय वर करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचं हे विधान घाणेरडं आहे. या विधानाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळेच रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच भाजपशी संबंधित लोक महिलांचा वारंवार अपमान करतात, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, ठाण्यातील हायलँड मैदानात योग गुरु रामदेव बाबा यांनी आज योगासन करत योगाचे धडे दिले. यावेळी ठाणेकरांनी योगासनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. तसेच मंचावर आमदार रवी राणा आणि दिपाली सय्यद देखील योगा करताना पाहायला मिळाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed