फेल डी.पी रविवारी बसविला गावकऱ्यांकडून लाईनमेनचा सत्कार
निलंगा :निलंगा महावितरण विभागा अंतर्गत कृषी पंपाच्या आणि गावठाण ,डी. पी.वर वाढलेल्या भारा मुळे डी. पी.फेल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निलंगा महावितरण विभागाचे कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी डी, पी, फेल वर लक्ष्य देऊन तात्काळ डी,पी, देण्यासाठी त्यांची सर्वोच्च प्राथमिता आहे. पण काहीवेळेला तांत्रिक अडचणी शासकीय सुट्ट्या आडव्या येतात पण शेतकऱ्याची आणि गावातील विद्यार्थ्यांची अडचण लक्ष्यात घेणून कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या आदेशानुसार लाईनमन अमोल कुलकर्णीआणि जीवन सावंत यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी फेल झालेला डी. पी. तात्काळ बसवून देऊन वीज पुरवठा चालू करून दिल्याबद्दल सावनगीरा येथील गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला
सावनगीरा गावातील गावठाण डिपी फेल झाला होता, यामुळे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व पिठाच्या गिरण्या बंद झाल्यामुळे महिलांचीही मोठी अडचण झाली होती , तरी पण.दि,17 डिसेंबर वार रविवार सुट्टीचा दिवस. असुन सुद्धा . अमोल कुलकर्णी व जीवन सावंत या लाईनमननी सुटीच्या दिवशी डि .पी बसवल्याबद्ल या कामाच कौतुक करुन गावकऱ्यांनी सत्कार केला आहे. यावेळी. भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अप्पाराव सोळंके. ग्राम पंचायत सदस्य बबनराव सोळंके.ग्राम पंचायत सदस्य अर्जुन शिंदे.बालाजी मामा जाधव, गोविंदराव सोमवंशी, मोहन सोळंके, तानाजी सोळंके, दिपक जाधव, दगडु जाधव, बालाजी सोळंके, राजेंद्र सोळंके, माधवराव काळे, व्यंकट कोरे, गुणवंत कोरे, अजित जाधव, सिद्राम सोळंके, राम सोळंके, कांत कासराळे, आदित्य सोळंके, जोतिराम सोळंके, बंकट कोरे, दगडू शिंदे.सर्व गावांतील नागरिक उपस्थित होते