• Fri. Jun 20th, 2025

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतील लातूर शहराचा पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेसाठी 565 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Byjantaadmin

Dec 16, 2023

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतील लातूर शहराचा पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेसाठी 565 कोटी रुपयांचा निधी मंजूर

– वाढत्या लातूर शहराची गरज आणि भविष्याचा विचार करून एकूण 1250 कोटीची योजना.
– दुसऱ्या टप्प्यात आणखी 700 कोटी मिळणार
-मांजरा धरणात स्वतंत्र नवीन पंप पाऊस उभारणार
-मांजरा धरण ते हरगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत समांतर नवी पाईपलाईन टाकणार
– शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन भूमिगत गटार योजना राबवणार
-सन 2055 पर्यंतचा शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढीचा विचार करून योजना राबवणार.

लातूर: (प्रतिनिधी); अत्यंत गतीने विकसित होत असलेल्या लातूर शहराची वाढती गरज लक्षात घेऊन मांजरा धरणापासून समांतर जलवाहिनीद्वारे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी 2 59.22 कोटी रुपये तर शहरातील भूमिगत गटार बांधणीसाठी 305.19 कोटी रुपये असे जवळपास 565 कोटी रुपये खर्चाची पहिल्या टप्प्याची योजना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून मंजूर झाली आहे. एकूण योजना जवळपास 1265 कोटी ची असून  दुसऱ्या टप्प्यात या योजनांसाठी आणखी जवळपास 700 कोटी रुपये मिळणार आहेत.

लातूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी सन 2055 पर्यंतचा विचार करून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  लातूर महानगरपालिकेने शहर पाणीपुरवयासाठी 550 कोटी रुपये खर्चाची योजना अमृत योजनेअंतर्गत शासनाकडे सादर केली होती, यात मांजरा धरणावर स्वतंत्र नव्याने पंप हाऊस उभारण्यापासून लातूरपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा समावेश आहे, सन 2004 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून मांजरा धरणातून थेट पाईपलाईन द्वारे लातूरला पाणी आणण्याची योजना राबवण्यात आलेली आहे, या योजनेला आता जवळपास 20 वर्षे पूर्ण होत आली आहेत. दरम्यानच्या काळात लातूर शहराच्या विस्ताराबरोबर लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदरील बाब लक्षात घेऊन आगामी 2055 पर्यंतचा शहरवाढीचा विचार करून आमदार अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पालकमंत्री असताना शहर पाणीपुरवठ्यासाठी नव्याने योजना आखण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 550 कोटी रुपये खर्चाची योजना तयार करून शासनाकडे सादर करण्यात आली होती, या योजनेतील पहिला टप्प्याला म्हणजे 259. 22 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला शासनाने आता मंजुरी दिली आहे. भूमिगत गटार योजनेसाठी 305 कोटी लातूर शहराचा वाढलेला विस्तार नव्याने निर्माण झालेल्या वस्त्या आणि आगामी काळात होणारा शहराचा विस्तार लक्षात घेऊन लातूर शहरात भूमिगत गटार योजना राबवण्यासाठी 700 कोटी रुपये खर्चाची योजना आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली आहे, या योजनेतीलही पहिला टप्प्याला म्हणजे 305.19 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला शासनाने आता मंजुरी दिलेली आहे, दोन्ही योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर मंजुरी मिळणार आहे, दोन्ही योजनांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आणखी जवळपास 700 कोटी रुपये मिळणार आहेत, सदरील योजनेचे प्रस्ताव तयार झाल्यापासून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि विनंती केली आहे,
सदरील योजनांसाठी पहिला टप्प्यात जवळपास 565 कोटी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गिरीशजी महाजन यांचे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *