• Tue. Apr 29th, 2025

देशमुख – चव्हाण  कुटुंबात स्नेह जिव्हाळा कायम

Byjantaadmin

Nov 25, 2022

देशमुख – चव्हाण  कुटुंबात स्नेह जिव्हाळा कायम

काही प्रसार माध्यमातुन प्रसारित झालेल्या बातम्या तथ्यहीन

अमीतजी देशमुख – अशोकरावजी चव्हाण यांच्याकडून फेसबुकवरून केली मत व्यक्त

भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी पासून प्रारंभ झाला खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेत देशातील अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील जनतेचा अधिक प्रतिसाद मिळाला राज्यात नांदेड व शेगाव येथील दोन्ही प्रचार सभेला मोठया प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकांची गर्दी तोबा झालेली होती हे वास्तव्य चित्र देशातील लोकांनी बघितले आहे राज्याच्या पदयात्रेत प्रत्येक स्थानीक नेते माजी मंत्री आमदार यांच्याकडे त्या त्या जिल्हयाची जवाबदारी काँग्रेस पक्षाने दिली होती त्यात नांदेड ची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे तर हिंगोली जिल्ह्यात स्वागताची जवाबदारी माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख यांच्या कडे होती दोन्ही नेत्यांनी आपापली जवाबदारी व्यवस्थित नियोजन करून सांभाळली आहे मात्र काही माध्यमांनी पदयात्रेत लातूर विरुद्ध नांदेड असा वाद असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न प्रसार माध्यम व सोशल मीडिया मधून यांच्या मधून दाखवन्याचा प्रयत्न करत आहेत याबाबत स्वतः माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी फेसबुक वर असा काहीच नाही जी काँग्रेस पक्षांनी दिली होती ती हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी ती व्यवस्थित नियोजन करून सांभाळली आहे असे सांगून माध्यमात सुरू असलेली चर्चा तथ्यहीन आहे काही लोकांना आमचे व अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध काहींना पाहावत नाही असेही त्यांनी म्हटले आहे तर अशोकराव चव्हाण यांनी ही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी टाकलेल्या फेसबुक वरील पोस्ट टाकत मी अमीत देशमुख यांच्या मताशी सहमत आहे असे त्यांनी त्यांच्या फेसबुक वरील पोस्ट मध्ये शेअर केले आहे त्यामुळे सोशल मीडिया व प्रसार माध्यमात होत असलेल्या चर्चेला आता विराम मिळेल असे वाटते

*वास्तव्य चित्र वेगळेच*

प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात निघालेल्या भारत जो डो यात्रेची जबाबदारी त्या त्या भागातल्या नेत्याकडे दिलेल्या होत्या ज्यांना ज्या ज्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडली आहे मात्र काही माध्यमांनी पदयात्रेत हे दिसनात ते दिसणात असाच वेगळा सुर धरलेला दिसत होता भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळाला आहे हे निर्विवाद सत्य आहे

भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी पासून प्रारंभ केला तामिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा करत ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आगमन झाले या नांदेड, हिंगोली, वाशिम अकोला बुलढाणा शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर पदयात्रेत अनेक ज्येष्ठ नेते नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी विचारवंत लेखक पत्रकार काँग्रेसचे नेते खासदार आमदार,पदाधिकारी सहभागी झाले होते ही यात्रा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांना तसेच नव्या पिढीला दिशा देण्याचे काम करेल याचा मोठा फायदा आगामी काळात होणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या तसेच जिल्हा परीषद निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास वाटतो

हरिराम कुलकर्णी
जेष्ठ पत्रकार
लातूर 🙏

९९७००८१०७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed