• Wed. May 7th, 2025

अजितदादा बोलले ते चूकच!, जाहीर निषेध, रोहित पवार आक्रमक

Byjantaadmin

Dec 13, 2023

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रोहित पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये राजकीय लढाई सुरु झाली. रोहित पवार आक्रमकपणे अजित पवार यांच्या विरोधात बोलताना दिसतात. आताही अजित पवार यांच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक वार केला आहे. अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं विधान चुकीचं आहे. जाहीर निषेध त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो, असं रोहित पवार म्हणालेत.

पुतण्याचा काकावर पुन्हा शाब्दिक वार; अजितदादा बोलले ते चूकच!, जाहीर निषेध, रोहित पवार आक्रमक

 

अजित पवार काय म्हणाले?

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक विधान केलं. याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांचा शाब्दिक वार

युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत? तर ही गरिबाची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारकडे येत असतील. सरकारची मदत घेत असतील. तर त्यात चूक काय? एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का? ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा निषेध मी करतो, असं रोहित पवार म्हणाले.

राम शिंदेंवर टीका

राम शिंदे यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. नीरव मोदीने त्यांच्या आमदाराकीच्या काळात जमीनी विकत घेतल्या होत्या.मग त्यांनी पासे खाल्ले असं म्हणायचं का ? राम शिंदे यांच्यावर टीका करण्यात मला रस नाही. आम्हाला त्यांच्यासारखं भाड्याने माणसे आणावी लागत नाही. युवा वर्ग आमच्यासोबत आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं.सुनावणी संपण्यापुर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच या सगळ्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही, असं रोहीत पवार म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *