शिवनेरी सेवा मंडळाचा शिवनेरी कट्टा हा कार्यक्रम नुकताच संपन्न
मुंबई -दादर (प्रतिनिधी जनार्दन सोनवडेकर)
शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने नुकताच दादर येथे शिवनेरी कट्टा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची संकल्पना अभिनेते जनाद॔न सोनवडेकर यांची होती. या कार्यक्रमाअंतर्गत हौशी कलावंतांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे प्रयोजन होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे चंद्रशेखर पुसाळकर सर यांनी सुंदर माऊथ ऑग॔न वाजवून केली. सदर शिवनेरी कट्टा या कार्यक्रमाचे उदघाटक मोहन पवार साहेब (अभियंता, लेखक, अभिनेते, निर्माते) यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली .याप्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रशेखर पुसाळकर सर.(भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातु) आणि विश्वस्थ दादासाहेब फाळके मेमोरियल फाऊंडेशन सोबत त्यांच्या पत्नी सौ. मृदुला चंद्रशेखर पुसाळकर उपस्थित होते. त्यांच्या सोबत पत्नी सौ. मोहन पवार, निर्माता-दिग्दर्शक गणेश तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुयोगी मोहन नाईक, कार्याध्यक्ष विष्णू ताडेल, प्रमुख कार्यवाह नितिन पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास कदम, सचिन मांजरेकर, विलास पेडणेकर, कार्यवाह किरण मोरजकर, प्रकाश भोसले. सांस्कृतिक विभाग प्रमुख अभिनेते श्री. जनाद॔न सोनवडेकर, अविनाश म्हसकर, सुहास पाटकर या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. शिवनेरी कट्टा या कार्यक्रमात 5 वर्ष ते 82 वर्ष वयोगटातील मुंबई मधील विविध विभागातून पनवेल – विरार पासुन कलाकार सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात एका पेक्षा एक कलाकारांनी विविध वेषात एकपात्री अभिनय, गायन (कराओके), नृत्य, वादन, वक्तृत्व अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर करून रसिक प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या जल्लोषात दाद मिळवली. या कार्यक्रमासाठी परिक्षक 1) समीर तडवी, 2) प्रज्ञा संजीव बोरकर, 3) अमृता प्रशांत पारकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विजते स्पर्धकांना प्रमुख पाहुणे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते ट्राॅफी, सन्मान चिन्ह, आणि प्रमाण पत्र देण्यात आले. चंद्रशेखर पुसाळकर सर यांनी ‘कभी अलविदा ना कहेना’ हे गाणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली तर सुत्रसंचालक सुनील कांबळी यांनी सर्व मान्यवर आणि कलाकारांचे आभार मानले.