• Tue. Apr 29th, 2025

सरपंचांनी गावचा विकास करण्यासाठी पारदर्शकता ठेवून कार्य करावे-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Nov 24, 2022

सरपंचांनी गावचा विकास करण्यासाठी पारदर्शकता ठेवून कार्य करावे

मांजरा कृषी विज्ञान येथील सरपंच प्रशिक्षण कार्यशाळेस राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांची भेट

सरपंच असताना केलेल्या कार्याचा दिलीपराव देशमुख यांनी दिला उजाळा

लातूर (जिल्हा प्रतिनिधी)यशदाच्या वतीने २२ ते २४ नोव्हेंबर २०२२ पासून मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे लातूर जिल्ह्यातील सरपंचाचे तीन दिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिर होत असुन या सत्राच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात
राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख  यांनी के. वी. के. सरपंच प्रशिक्षण केंद्रास भेट देवुन नियोजनाची पहाणी केली . यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख  म्हणाले की लातूर जिल्ह्यातील सरपंचाना बाभळगाव च्या सरपंचपदी असतानाच्या आठवणींना उजाळा दिला मी सरपंच कसा झालो , ग्रामसभा , मासिक सभा का घ्याव्यात? सरपंच हे महत्वाचे पद आहे केंद्र,आणी राज्य सरकार योजना तयार करत असले तरी योजनाची अंमलबजावणी सरपंचानीच करायची असते म्हणून सरपंचानी आपले गाव आदर्श होण्यासाठी पारदर्शक व उत्कृष्ट दर्जाची कामे करायला हवी , त्यांच्या सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्ष तथा मंत्री पदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत विविध ग्रामीण भागातील विकासाबद्दल कार्याची माहिती दिली जेणेकरून नूतन सरपंचांना याचा फायदा होईल असे त्यांनी स्पष्ट केले

यावेळी प्रास्ताविकात यशदाच्या सत्र समन्वयक निता मगर यांनी लातूर जिल्ह्यातील सरपंच प्रशिक्षणाचा आढावा व यशदाच्या सध्या मराठवाड्यात व राज्यात चालू असलेल्या सरपंच प्रशिक्षण सेंटर चा आढाव्याची सविस्तर माहिती देवुन व नव्याने निवडून येणाऱ्या सरपंचाच्या प्रशिक्षणाच्या नियोजणा बद्दलचा ही सविस्तर आढावा सादर केला. या वेळी मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. दिग्रसे, मास्टर ट्रेनर माधव गंभीरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed