• Mon. Apr 28th, 2025

विकसित भारत संकल्प यात्रा लातूर शहरात दाखल, ८ दिवस असणार शहरात

Byjantaadmin

Dec 10, 2023

विकसित भारत संकल्प यात्रा लातूर शहरात दाखल, ८ दिवस असणार शहरात

योजनांची माहिती आणि वंचित लाभार्थ्यांशी साधणार संपर्क

 

लातूर  ( जिमाका ) केंद्र शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना सर्वसामान्यांना कळाव्यात आणि या लाभापासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच लाभांपासून वंचित राहिलेल्या घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते लातूर शहरातील लक्ष्मी धाम सोसायटी परिसरात कारण्यात आला.यावेळी सहआयुक्त रामदास कोकरे,माजी नगरसेविका रागिनी यादव,स्वाती घोरपडे,श्वेता लोंढे,शोभा पाटील व वायचळकर मॅडम यांची उपस्थिती होती.

ही यात्रा दि.९ ते १६  डिसेंबर या कालावधीत शहाराच्या विविध भागात चित्ररथाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देणार आहे.या सोबतच वंचित लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.या विकसित भारत संकल्प यात्रेत दीनदयाळ अंत्योदय योजना,प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना,उज्वला योजना व आधार कार्ड संदर्भात माहिती दिली जाणार आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाईव्ह कार्यक्रम एलईडी व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना दाखवण्यात आला.परिसरातील जवळपास ५०० नागरिक यावेळी उपस्थित होते. शनिवारी शहरातील लक्ष्मीधाम सोसायटीतला कार्यक्रम संपला. त्यानंतर आर्वी येथे ही यात्रा पोहोचेल.

शहरात खालील ठिकाणी होणार कार्यक्रम

रविवार दि.१० रोजी सकाळी १० ते १ या काळात सोनानगर येथे यात्रा पोहोचणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत सूळनगर येथे यात्रा पोहोचणार आहे.

सोमवार दि.११ रोजी सकाळी १०ते १या कालावधीत बसवंतपूर तर दुपारी ३ ते ६ या काळात सोहेल नगर येथे यात्रा पोहोचेल.दि.१२ रोजी सकाळी १० ते १सावेवाडी व दुपारी ३ ते ६ वरवटी (हडको )येथे यात्रा पोहोचणार आहे.

दि.१३ रोजी सकाळी १० ते १ अन्सार कॉलनी येथे व दुपारी ३ ते ६  गंजगोलाईत विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचेल.दि.१४ रोजी विवेकानंद चौक येथे सकाळी १० ते १ व मंठाळे नगर मध्ये दुपारी ३ ते ६ यात्रा पोहोचणार आहे.

दि.१५ रोजी यात्रा भीमनगर येथे सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ६ बुद्ध गार्डन येथे यात्रा जाणार आहे.दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ विकसित भारत संकल्प यात्रेतील एल इ डी व्हॅन आंबेडकर पार्क येथे जाणार आहे.

त्या- त्या भागातील नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी व्हावे.केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी नोंदणी करावी,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed