• Mon. Apr 28th, 2025

महानगरपालिका अंतर्गत महिला बचत गटाची यंदा जलदिवाळी साजरी होणार

Byjantaadmin

Nov 8, 2023

महानगरपालिका अंतर्गत महिला बचत गटाची यंदा जलदिवाळी साजरी होणार

लातूर;प्रतिनिधी: गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, AMRUT २.० अंतर्गत, दि. ०७ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत “जल दिवाळी साजरी करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने “Women for water, Water for Women Campaign” (पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान” नावाचा एक अनोखा उपक्रम आयोजित करावयाचे होते त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.08 नोव्हेंबर 2023 रोजी हरंगूळ जल शुद्धीकरण केंद्र येथे अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले. शहरामधील बचत गटाच्या जवळपास 75 महिलांनी ड्रेस कोडसह या सहलीमध्ये सहभाग घेतलेबचत गटाच्या महिलांच्या या अभ्यास सहलीस मनपा उपायुक्त श्रीमती.मयूरा शिंदेकर यांनी हिरवा झेंडा दाखविले.

                स्वयंसहाय्यता बचत गटामधील ( SHGs) महिलांना लातूर शहरांमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या Water Treatment Plants (WTPS) यांना भेट देण्याची संधी देण्यात आली याच्या माध्यमातून व या भेटींमुळे त्यांना घरोघरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्लांटची व मशीनरीची, पाणी पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची माहिती, पाणी साठवणूक क्षमता, लातूरकरांना दररोज किती पाण्याचा पुरवठा केला जातो,   नागरिकांना उच्च व गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजयकुमार चव्हाण व शाखा अभियंता पाणी पुरवठा श्रीमती उषा शिंदे यांनी बचत  गटाच्या महिलांना सविस्तर माहिती दिले.

              जलशुद्धीकरण केंद्रावरील भेटी दरम्यान पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि स्वमालकीची भावना वाढवणे, पाण्याचा होणारा अपव्यय, पाण्याची बचत व काटकसर करणे, महिलांची पाण्यासाठी असणारी संवेदना, जबाबदारी व भूमिका, याबाबत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव यांनी माहिती दिले.  शिवाय या भेटींमुळे महिलांना मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण होईल, सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना मिळेल. बचत गटातील महिलांनी यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, पाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये महिलांचा समावेश वाढावा, एकूणच गटांमधील महिलांचा अनुभव वाढविण्यासाठी या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. सदर सहलीमध्ये महिलांना पोस्टर्स, बॅनर च्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून (निळ्या रंगाची Hand Bag. पाणी बॉटल, ग्लास ) देण्यात आले.

             जलदिवाळी (पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी) या अभियान” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नितिन सुरवसे, वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष विद्या सूर्यवंशी व बचत गटाच्या महिला तसेच समुदाय संघटक विरेंद्र सातपुते, प्रवीण गर्जे, समूह संसाधन व्यक्ति लोमावती मुळे, शामल भालेराव, निता भालेकर,अनिता पवार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed