• Mon. Apr 28th, 2025

आदर्श मैत्री फाऊंडेशनने 250  वंचित कुटुंबाची दिपवाळी केली गोड 

Byjantaadmin

Nov 8, 2023
आदर्श मैत्री फाऊंडेशनने 250  वंचित कुटुंबाची दिपवाळी केली गोड
लातूर – आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने गेली दहा वर्षापासून समाजातील वंचित घटक ज्यांना दिवाळी सण करणे शक्य नाही अशा घटका सोबत  दिपवाळी साजरी करत त्यांना अभंग्यस्नान किट, दिपवाली फराळ व साड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम करण्यासाठी सर्वप्रथम आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना पेपरची रद्दी संकलित करण्याचे आव्हान केले व त्यातून आलेली रक्कम व आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या संचालकाच्या सहकार्यातून 250 कुटुंबांना दिपवाळी साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी भागवत जी फुंदे महावितरणचे कार्यकारी अभियंता सुंदर लटपटे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी तहसीलदार तांदळे सौदागर या मान्यवरासह फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, संचालक तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, निलेश राजमाने , सच्चिदानंद ढगे, सोनू डगवाले, इस्माईल शेख, राजेश जी मित्तल, सूर्यकांत कठारे, अशोक तोगरे, विवेक सौताडेकर,  दासराव शिरूरे, आर पी बिरादार, प्रमोद भोयरेकर, उत्तम देशमाने, ओमप्रकाश झुरळे, अमोल जानते, प्रवीण सूर्यवंशी, संभाजी माळी, तेजस शेरखाने, प्रमोद टेकले, संपत जगदाळे, आसिफ शेख, संभाजी नवघरे, आनंद सूर्यवंशी, यु बी जाधव, मदन भगत यांची उपस्थिती होती                                                        हा समाज शिक्षणापासून वंचित आहे, यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य फाउंडेशनच्या माध्यमातूनकरणार असून भविष्यात त्यांच्या आरोग्याविषयी, शैक्षणिक, महिला विषयी कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून करणार असल्याचे मत फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी  व्यक्त केले.याप्रसंगी मान्यवरांचे मनोगत झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तोवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ओम प्रकाश झुरळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed