“शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर त्यावेळी देण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातटिकावे यासाठी फडणवीसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले असते. त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला असता”, असा दावा (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. ते नागपुरात बोलत होते.
राज्याचे अन्न आणि नगरी पुरवठा मंत्री छगन भुजबळयांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर, सत्ताधारी नेत्यांमध्येच वादावादी सुरु झाली आहे. मराठा आरक्षणाविषयी मतमतांतर दिसून येत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट आरोप केला. मराठा आरक्षणाचा घात करणारे खरे आरोपी उद्धव ठाकरे असल्याचा हल्लाबोल, बावनकुळे यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण टिकवलं असतं
उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे आज हा विषय अद्याप प्रलंबित आहे. असे असले तरी महायुतीचं सरकारच मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं बावनकुळे म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीत ठरलेली भूमिका, तीच छगन भुजबळांची
छगन भुजबळांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वादंग उठला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठा आरक्षणाविषयीच्या त्यांच्या भूमिकेमुळे पुन्हा संभ्रम निर्माण होत आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, “छगन भुजबळ यांची भूमिका सर्वपक्षीय बैठकीच्या भूमिकेसारखीच आहे, ते वेगळे काहीच बोलले नाहीत.devendra fadanvis यांनी मराठा समाजाला ज्याप्रमाणे तत्कालिन काळत वेगळे आरक्षण दिले होते, तसेच टिकावू आरक्षण आतादेखील महायुतीचे सरकार देईल” असा मला विश्वास आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू नये हीच एक मागणी छगन भुजबळ यांची आहे. आम्ही कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे टिकावू आरक्षण मराठा समाजाला देऊ, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचं जातीने लक्ष
सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे सरकारने काम करावं असेच सध्या भुजबळ बोलत आहेत.त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगितले होते की मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल. आणि स्वतः मुख्यमंत्री shinde shinde ंनी या विषयात जातीने लक्ष घातले असून, हा तिढा लवकरच सुटेल, असं बावनकुळेंनी नमूद केलं.