मेस्टा निलंगा तालुका कार्यकारणीची निवड
निलंगा(प्रतिनिधी):- येथील डी. के. पाटील इंग्लिश स्कूल सरस्वती कॉलनी येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन,लातूर जिल्हाध्यक्ष पुष्कराज खुबा,ग्रामीण जिल्हाध्यक्ष बप्पा कावळे,जिल्हा सचिव व्यंकटराव दापेगावकर,जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानोबा भोसले,जिल्हा उपाध्यक्ष जनक गायकवाड,जिल्हा सहसचिव सुशील वाघमारे यांच्या उपस्थितीत दत्तात्रेय पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच सुशील जाधव यांची निलंगा तालुकाध्यक्षपदी दत्तात्रेय माने व मेघराज जेवळीकर यांची निलंगा तालुका उपाध्यक्ष, निलंगा तालुका सचिव हकानी पटेल, निलंगा तालुका कोषाध्यक्ष सवेश होगाडे,निलंगा प्रसिद्धीप्रमुख महादेव दूधभाते,निलंगा महिला तालुकाध्यक्ष आशा सबनीस तसेच सदस्य म्हणून पवन बाहेती,नेताजी मोरे,भगवान कुलकर्णी,निहाल पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.