‘माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यांदेखत माझ्या मुलाने ajit pawar मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे’, अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्री आशाबाई पवार यांनी व्यक्त केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाबाई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन ग्राम पंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांजवळ आपली इच्छा व्यक्त केली.
अजित पवारांच्या आईनं व्यक्त केलेल्या या इच्छेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.nagpur येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार nana patole व akola येथे भाजपचे मंत्रीradhakrishan vikhe patil यांनी याविषयावर आपलं मत स्पष्टपणे मांडलं.यासंदर्भात पटोले म्हणाले की, प्रत्येकच आईला आपला मुलगा किंवा मुलगी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असते. यात गैर किंवा चुकीचं काहीच नाही. मात्र पवार मुख्यमंत्री होतील की नाही, हे आगामी काळात दिसेलच असं पटोले म्हणाले. यावर अकोला येथे प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुलगा मुख्यमंत्री व्हावा ही एका आईची इच्छा आहे. पवार यांच्या मातोश्रीनं जी इच्छा व्यक्त केली, त्यात गैर काहीच वाटत नाही. यासंदर्भात अधिक बोलण्याचे मात्र दोन्ही नेत्यांनी टाळलं.नागपुरात रविवारी (ता. ५) बोलताना आमदार नाना पटोले यांनी अन्य मुद्द्यांनाही हात घातला. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेड्युल दहाप्रमाणे जे अधिकार आहेत ते अध्यक्षांचे आहेत. ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करून मुख्य न्यायाधीश आमदारांच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. विधिमंडळाला संविधानानुसार अधिकार मिळाले आहेत. अशात कुणी मनमानी करीत असेल तर त्याला लगाम लावण्याचं काम न्यायालयाला करावं लागतं.
मराठा आरक्षणाबाबत पटोले म्हणाले की, कुठेतरी चुकीचे ‘मोमेंट’ टाकल्या जात आहेत. मराठवाड्यात कुणबी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांना फायदे मिळत नाही. मागासवर्ग आयोग नेमून ओबीसी प्रमाणात देण्याची सूचना आपण फार पूर्वी केली होती. शिंदे समितीला काही नोंदी आढळल्या. यासाठी जनगणना महत्वाची आहे. केंद्र सरकारनं जनगणना थांबवून ठेवलीय. ५० टक्क्यांची मर्यादा काढल्याशिवाय आरक्षणातील अडचण दूर करता येईल, असं वाटत नाही.गुजरातचं ड्रग्स महाराष्ट्रात आणण्याचं काम राज्य सरकारनं केल्याचा ठपका ठेवत पटोले यांनी सरकार राज्याला ड्रग्सच्या विळखयत आणण्याचं काम करीत असल्याचा आरोप केला. ललित पाटीलच्या माध्यमातून यापूर्वीही हे पुढं आलय. मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात ड्रग्स येतात, असा आरोपही त्यांनी केला.छत्तीसगढमध्ये भाजपनं जाहीरनामा काढला. गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याचं आश्वासन पंतप्रधान देत आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात. एका राज्यापुरते मर्यादीत नसतात. मग एका राज्यात जाऊन त्यांना ही घोषणा करण्याची गरज का भासली असा प्रश्नही आमदार पटोले यांनी व्यक्त केला. महागाई कितीही केलं तरी लपवता येत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष राज्यात फिरत आहेत. त्यांना याचा अनुभवही आलाय, असे ते वर्धा येथील घटनेबाबत म्हणाले. देशात गरीबी नसल्यानं स्वतः नरेंद्र मोदी सांगतात. मग देशात गरीबी नाही, तर ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा का केली. त्यातही रेशनमध्ये सर्वच धान्य मिळत नाही. हा देखील त्यांचा एक जुमला आहे, असे पटोले म्हणाले.
गुजरातचं ड्रग्स महाराष्ट्रात आणण्याचं काम राज्य सरकारनं केल्याचा ठपका ठेवत पटोले यांनी सरकार राज्याला ड्रग्सच्या विळखयत आणण्याचं काम करीत असल्याचा आरोप केला. ललित पाटीलच्या माध्यमातून यापूर्वीही हे पुढं आलय. मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात ड्रग्स येतात, असा आरोपही त्यांनी केला.छत्तीसगढमध्ये भाजपनं जाहीरनामा काढला. गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याचं आश्वासन पंतप्रधान देत आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात. एका राज्यापुरते मर्यादीत नसतात. मग एका राज्यात जाऊन त्यांना ही घोषणा करण्याची गरज का भासली असा प्रश्नही आमदार पटोले यांनी व्यक्त केला. महागाई कितीही केलं तरी लपवता येत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष राज्यात फिरत आहेत. त्यांना याचा अनुभवही आलाय, असे ते वर्धा येथील घटनेबाबत म्हणाले. देशात गरीबी नसल्यानं स्वतः नरेंद्र मोदी सांगतात. मग देशात गरीबी नाही, तर ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा का केली. त्यातही रेशनमध्ये सर्वच धान्य मिळत नाही. हा देखील त्यांचा एक जुमला आहे, असे पटोले म्हणाले.