• Tue. Apr 29th, 2025

दिशा सालियानचा मृत्यू हा अपघातीच:सीबीआयचा अहवाल, तोल गेल्याने 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Byjantaadmin

Nov 23, 2022

मुंबई:-दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबाआयने मोठा खुलासा केला आहे.

दिशा सालीयन हिचा मृत्यू हा अपघातीच होता. तोल गेल्याने 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला, असे तपासाअंती आपल्या अहवालात सीबीआयने स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलिसांकडून तपास CBIकडे

8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता.
8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता.

गेल्या दोन वर्षांत दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन राजकारण तापले होते. या प्रकरणावरून भाजपने थेट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मविआ काळात मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, ठाकरे सत्तेत असताना मुंबई पोलिस या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करू शकत नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर हे हे प्रकरणी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते.

दोन वर्षे तपास

सीबीआय सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासोबतच दिशा सालियन मृत्यूचाही तपास करत होते. गेली दोन वर्षे सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल, अनेक साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल या सर्वांची पडताळणी सीबीआयने केली. तपासानंतर अखेर सीबीआयने आपले निष्कर्ष मांडले आहेत.

अहवालात सीबीआयने म्हटले आहे की, तोल गेल्यानेच 14 व्या मजल्यावरून दिशा सालीयन खाली पडली. यातच तिचा मृत्यू झाला. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.

दोन वेगवेगळ्या घटना

दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केली होती, असे सीबीआयच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे. तर, आता दिशा सालियन हिचा मृत्यूदेखील एक अपघात होता, असे सीबीआयच्या अहवालातून समोर आल आहे.28 वर्षीय दिशा सालियन ही मालाड येथे राहत होती. 8 जून 2020 रोजी तिचा मृत्यू झाली होता. मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन दिशा सालियन खाली कोसळली होती. दिशा नेमकी खाली कशी पडली की तिला कुणी ढकलल?, यावर वाद होता. अखेर या वादावर आता सीबीआयने पडदा टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed