• Wed. Apr 30th, 2025

‘महाविजय 2024’ साठी 288 मतदारसंघात वॉर रूम, प्रत्येकावर असणार लक्ष

Byjantaadmin

Nov 4, 2023

मुंबई: महाविजय 2024 साठी भाजपने कंबर कसली असून महाराष्ट्रासाठी  मेगा प्लॅन तयार केला आहे. येत्या लोकसभा  आणि विधानसभेसाठी भाजपकडून राज्यभरात वॉर रूम उभारण्यात येणार आहे. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघ आणि 48 लोकसभा मतदारसंघात वॉर रूम उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

महाविजय 2024 साठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर भाजपचे वॉररुमचे जाळे पसरवण्यात येणार आहे. राज्यातल्या 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वॉररूम सुरु करणार आहे. वॉररुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघावर विशेष लक्ष असणार आहे. तसेच त्या माध्यमातून मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहेत.

प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवणार 

वॉर रुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारावर भाजप ठेवणार लक्ष ठेवणार आहे. त्या माध्यमातून मतदारसंघातील समस्या, विषयांची माहिती घेण्यात येणार आहे. भाजपच्या या तयारीसंबंधी माहिती देताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, भाजप 365 दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे. 2014 पासून निवडणूक व्यवस्थापन मध्ये एक वैशिष्ट्य भाजपने तयार केले आहे. त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघात 288 वॉर रुम तयार करत आहोत. ही तयारी महायुतीसाठी आहे. एखादा मतदारसंघ महायुतीच्या शिवसेना मित्र पक्षाकडे असेल, तर ती जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यादृष्टीने आम्ही या वॉर रुम तयार करत आहोत.

वॉर रूममध्ये तीन जबाबदाऱ्या 

या वॉर रुममध्ये तीन प्रकारच्या जबाबदारी आहेत. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करणे, अधिक गतीमान पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करणे आणि तिसरे काम म्हणजे केंद्र व राज्यातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे असा उद्देश आहे.

भाजपचं मिशन 45

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहेलोकसभेच्या  48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ,SOLAPUR KOLHAPUR SATARA या मतदारसंघात  भाजप आपली ताकद लावणार आहे.  यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed