सर्वधर्मसमभाव चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त भाविकभक्तांची मौन श्रद्धांजली
मोझरी- श्रीक्षेत्र गुरुकुल मोझरी तिवसा येथे ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये देश विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी गुरुवारी ४ वा.५८ मि.गुरुकुल आश्रमात श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी सर्व मोझरी परिसराने स्तब्ध राहून मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
“मज वेडची गुरुकुंजाचे आवडतो मज कण कण तिथला !” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे दोन्ही हात जोडून प्रार्थना करण्यात आली.यानंतर “चलाना भाई नाम गुरू का चलाना” तसेच ‘आरती राष्ट्रसंताची’ ही आरती व सामूहिक प्रार्थना करण्यात आली.यावेळी हिंदू,मुस्लिम,बौद्ध,जैन,ख्रिश् चनअशा सर्व धर्माच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून करण्यात आल्या.*यावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर,सौ.संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर,खासदार नवनीत राणा,आ.बळवंत वानखेडे,आ.अमोल मिटकरी,निवेदिता दीघडे,आ.देवेंद्र भुयार,अनेक राजकीय मंडळी उपस्थित होते.* तर जय गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोडे यांनी सेवा मंडळाच्या वतीने सौ.संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर यांचा जयगुरुदेव यांची प्रतिमा व शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विश्वशांतीचा संदेश देण्यात आला काही अतिरेकी संघटना धर्मयुध्दाच्या नावाखाली अशांतता पसरविण्याचे काम करीत आहेत सर्व राष्ट्रांनी सर्वधर्मसमभावाचा झेंडा हाती घेऊन मानवतेसाठी जागतिक शांततेचा प्रसार करावा असे आवाहन करण्यात आले.या सोहळ्यास सर्व प्रचारक,राजकीय,धार्मिक,व सामाजिक क्षेत्रातील गनमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते