• Tue. Apr 29th, 2025

बापरे! तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्विकारली!

Byjantaadmin

Nov 4, 2023

अहमदनगर : काल रात्री उशिरा नाशिक  येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची लाच (Bribe) घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. याबाबत रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Latest News Assistant engineer arrested for taking bribe of Rs one crore in Ahmednagar by nashik acb Ahmednagar : 'तुझा हिस्सा राहू दे तुला, माझ्या हिस्स्याचं कळवतो तुला', बापरे! तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्विकारली!

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाच्या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउट वर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताचे स्वाक्षरी घेण्यासाठी (Assistant Engineer) अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसारलाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सहाय्यक अभियंता गायकवाडला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने NASHIK च्या एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे  MIDC औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50 टक्के वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिल्याची माहिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

CHATRAPATI SAMBHAJI NAGAR येथील शासकीय ठेकेदार यांनी AHMADNAGAR येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे, म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी केली. याबाबत शासकीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबी पथकाने सापळा रचत लाच स्वीकारताना गायकवाड यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान आतापर्यंत सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed