• Tue. Apr 29th, 2025

प्रा. नयन भादुले-राजमाने यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

Byjantaadmin

Nov 3, 2023

प्रा. नयन भादुले-राजमाने यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान
लातूर येथील विविध क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या प्रा. नयन भादुले-राजमाने यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी रचनाकार शरद सिंह: एक मूल्यांकन या शीर्षका अंतर्गत मध्य प्रदेशातील लेखिका डॉ.(सुश्री) शरद सिंह यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण शोध प्रबंध सादर केला. संशोधनास मार्गदर्शक प्रो.(डॉ.) सतीशजी यादव यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. नयन भादुले-राजमाने एम.ए, बी.एड, एम.फील, डि.एस.एम आहेत. त्यांची 5 पुस्तके प्रकाशित आहेत, वृत्तपत्र, दिवाळी अंक, प्रासंगिक लेखन, आकाशवाणी कार्यक्रम प्रसारण,अशाप्रकारे त्या साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीमध्ये सक्रिय सहभागी असतात. सध्या त्या गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत आहेत. याप्रसंगी संस्था सचिव श्री. धनराज जोशी, संस्था सदस्य रमेश बोरा, प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, डॉ.सचिन प्रयाग सर्व प्राध्यापक वर्ग, नारी प्रबोधन मंच अध्यक्ष सुमती जगताप, समाज प्रबोधन मंचच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. कुसुमताई मोरे शब्दांकित साहित्य मंचचे पदाधिकारी,सर्व सदस्य,हिंदी साहित्य परिषद, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.रणजीत जाधव डॉ. हनुमंत पवार, डॉ. अमोल इंगळे, डॉ. राजकुमार बिराजदार, डॉ.विकास पाटील, डॉ. इमरान शेख, महेश राजमाने,श्रध्दा घेवारी, गौरी कुंबरे, सौरभ घेवारी, मनजीत कुंबरे, उमा कोल्हे, उल्का डोंबे, उज्वला गाढवे, आशा पाटील, रामलिंग भादुले, सागर राजमाने, विक्रांत हिंगमिरे,शितल शिपटे- बोराळे, ज्योती कदम, आकांक्षा घेवारी, अपूर्वा कुंबरे, शिवकांता गडकर इ. सर्वच स्तरातून व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed