निलंगा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण मागे
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा यामागणी साठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून अंतरवली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केले होते त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निलंगा शहर तसेच निलंगा तालुक्यातील निलंगा, औरद, कासार शिरशी, उमरगा हा, लिंबाळा, मुदगड एकोजी, हलगरा, भंगार चिंचोली, दादगी, शेडोळ, लांबोटा, कोतल शिवणी, सरवडी, माकणी, तगरखेडा,भूतमुगळी, मदनसुरी, वडगाव, हाडगा, पानचिंचोली,अंबुलगा मेन, अंबुलगा(बु),नणंद,शिरोळ वांजरवडा, तांमरवांडी,अश्या ऐकून तीस पेक्षा अधिक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू होते तर एकशे वीस पेक्षा अधिक गावांमध्ये सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती निलंगा शहर व तालुक्यातील तीव्रतेने हे आंदोलन सुरू करण्यात आले होते, निलंगा शहरात सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी काल बिराजदार कोचिंग क्लासेस च्या वतीने कँडल मार्च काढून पाठिंबा देण्यात आला होता.
मनोज जरांगे पाटील यांची काल शासनातील शिष्टमंडळाने भेट घेऊन आमरण उपोषण माघे घ्यावे व कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्याचा वेळ मागितला होता तो त्यांनी दिला व आपले आमरण उपोषण मागे घेतले, त्याच प्रमाणे निलंगा शहरात आमरण उपोषणाला बसलेले चक्रधर शेळके, किरण पाटील, ईश्वर पाटील यांनी पोलीस प्रशासन,डॉक्टर असोसिएशन व सकल मराठा समाजबांधव यांच्या उपस्थिती मध्ये नारळ पाणी घेऊन आपले आमरण उपोषण माघे घेतले व पुढील लढ्यास आम्ही सज्ज आहोत असे मत व्यक्त केले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, दादा शिंदे,डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे,डॉ. मनोहर सायगावकर, डॉ. शाहुराज माकनिकर,प्रमोद हातागळे,किरण बाहेती,डॉ. श्रीधर अहंकारी, गिरीधर सूर्यवंशी व सर्व सहकारी, सकल मराठा समाजाचे जाधव एम एम,विशाल जोळदापके,डी.एन. बरमदे, प्रमोद कदम,विनोद सोनवणे,हरिभाऊ सगरे,संजय इंगळे, किशन मोरे, राजकुमार साळुंके,भगवान जाधव, सुरेंद्र महाराज गुऱ्हाळकर,महेश ढगे, वैभव गोमसाळे, विष्णू मोहिते,आर के नेलवाडे, तिरुपती शिंदे,प्रदीप कदम,नाना आकडे,बाळासाहेब बिराजदार, विशाल पवार, बंटी देशमुख,विठ्ठल बिरादार आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.