निलंगा येथे शुक्रवारी भव्य मुशायरा कार्यक्रम
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा येथे सर्वधर्मी जयंती उत्सव समिती तर्फे व मरहूम अब्दुल खादरपाशा देशमुख यांच्या समरणार्थ हजरत टिपू सुलतान (रहे.)यांच्या जयंतीनिमित्त भव्य मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
निलंगा शहरातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर संस्कृतीक सभागृह (टाऊन हॉल ) येथे दि.25 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता हे मुशायरा आजोजित केला असून यात देशभरातील प्रसिद्ध शायर उपस्थित राहणार आहेत यात अब्दुल वाहिद अन्सारी,सुंदर मालेगावी,कपिल जैन,हमीद भुसावली,महेक करनवी,इरशाद अंजुम सहभागी होणार आहेत.
या सांस्कृतिक मुशायरा कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके,पंडित धुमाळ,शिवाजी माने,विजयकुमार पाटील,हमीद शेख,अजित माने,विलास माने,मोहम्मद खान पठाण,दयानंद चोपणे, इस्माईल लदाफ, विलास सूर्यवंशी,रजनीकांत कांबळे,मुजीब सौदागर,अमोल सोनकांबळे,विनोद आर्य,ईश्वर पाटील, धमानंद काळे,लाला पटेल, डॉ. अरविंद भातम्बरे, सबदर कादरी,रोहित बनसोडे, बाबा बिबराळे, तुराब बागवान,दत्ता मोहोळकर,प्रशांत वंजारवडे, गोविंद सूर्यवंशी,अहेमद शेख, अजगर अनसारी, सिराज देशमुख, अंकुश ढेरे,सुनील सूर्यवंशी,देवदत्त सूर्यवंशी आदींनी केले आहेत.