सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला होता. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा भाजप मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विद्यापीठात काही विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला.सावित्रीबाई फुले विद्यापीठातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू केले. यावेळी डाव्या संघटना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने विद्यापीठ परिसरात मोठा गोंधळ झाला.
पुणे विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वारंवार घडत आहेत. समविचारी संघटना एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहित आहेत,विद्यापीठात जेएनयूची पुनरावृत्ती घडविण्याचे काम काही संघटना करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्यांनी डाव्या संघटनांचा ध्वज पायाखाली तुडवत निषेध केल्याने डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले व दोन्ही गट एकमेकांना भिडले. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला तर डाव्या संघटनांकडूनही इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.एकमेकांविरोधातील घोषणाबाजीने विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केली. विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.