• Tue. Apr 29th, 2025

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या SSC-HSC परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Byjantaadmin

Nov 3, 2023

राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने (Maharashtra Education Board) पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च  २०२४  दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक २ नोव्हेंबर २०२३ पासून मंडळाची अधिकृत वेबसाई www.mahasscboard.in वर उपलब्ध होणार आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) लेखी परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. याआधी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. आज अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.

इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४  ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये आयोजित केलेले तारीखनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed